इंदापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात सापडले २१३ कोरोना बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 07:16 PM2021-04-16T19:16:56+5:302021-04-16T19:20:03+5:30

सोळा दिवसात १ हजार ८२९ कोरोनाबाधित

Outbreak of corona in Indapur taluka, 213 corona infected patients found in a single day | इंदापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात सापडले २१३ कोरोना बाधित रुग्ण

इंदापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवसात सापडले २१३ कोरोना बाधित रुग्ण

Next
ठळक मुद्देकोरोना बाधितांचा आकडा वाढू लागल्याने नागरिकात भीतीचे वातावरण

इंदापूर : इंदापूर तालुक्यात एकाच दिवसात ग्रामीण भागातील १८० व शहरी भागातील ३३ असे एकूण २१३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याला तालुक्यातील बेजबाबदार व निष्काळजी नागरिकच जबाबदार असल्याचे चित्र दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या सोळा दिवसात म्हणजेच १ ते १६ एप्रिल दरम्यान, शहरी व ग्रामीण भागातील एकूण १ हजार ८२९ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले आहे. 

तालुक्यातील आरोग्य, महसूल व सर्वच प्रशासन कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी मेहनत घेत आहे. विशेषतः नगरपालिका प्रशासन प्रत्येक वार्डात जाऊन  लसीकरण व आरोग्य तपासणीबाबत नागरिकांना जागृत करत आहे. तर दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा दिवस रात्र कष्ट घेत कोरोना बधितांवर उपचार करत आहेत. 

इंदापूर तालुक्यात खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांसाठी लागणारे रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची खूप मोठी धावपळ होत आहे. हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने खाजगी आरोग्य विभागही हतबल झाले आहे. त्या इंजेक्शन व्यतिरिक्त इतर औषधी उपचार करून रुग्णांना दिलास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

इंदापूर तालुक्यात दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत, मात्र मागील सव्वा वर्षात सर्वाधिक रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत. तर मागील सोळा दिवसात एकूण २२ कोरोना बधितांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपजिल्हा रुग्णालयात योग्य उपचार चालू

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात आपल्याकडे एकूण ८० रुग्ण दाखल करण्यात येतात. दररोज शेकडो नवीन रुग्णांची भर पडत असल्याने, आम्ही शर्थीचे प्रयत्न करून ८० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करत असतो. शासकीय मध्ये रेमडीसीव्हिर इंजेक्शनची कमतरता नाही. रुग्णांना शासनाकडून उत्तम उपचार मिळत आहेत. 

                                           डॉ. एकनाथ चंदनशिवे - वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक इंदापूर उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर 

नागरिकांनी शासनाचे नियम तंतोतंत पाळावेत 

इंदापूर तालुक्यात आज अखेर ग्रामीण भागात ६ हजार ७८६ तर शहरी भागात १ हजार ४०० रुग्ण असे एकूण ८ हजार १८६ रुग्ण बाधित झाले असून त्यातील १७४ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.  तर आज अखेर ६६५२ रुग्ण बरे करून घरी सोडले आहेत. नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून, शासनाचे सर्व नियम तंतोतंत पाळले पाहिजेत. 

                                                                                                 अनिल ठोंबरे - प्रभारी तहसिलदार, इंदापूर 

Web Title: Outbreak of corona in Indapur taluka, 213 corona infected patients found in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.