पूर्ववैमनस्यातून बिगाऱ्याने केला गवंड्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:11 IST2021-07-27T04:11:00+5:302021-07-27T04:11:00+5:30

बारामती : सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून बिगारी काम करणाऱ्याने गवंड्याला मारहाण करीत त्याचा खून केल्याची ...

Out of prejudice, Bigarya committed the murder of a bricklayer | पूर्ववैमनस्यातून बिगाऱ्याने केला गवंड्याचा खून

पूर्ववैमनस्यातून बिगाऱ्याने केला गवंड्याचा खून

बारामती : सोनवडी सुपे (ता. बारामती) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून बिगारी काम करणाऱ्याने गवंड्याला मारहाण करीत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. दीपक आनंदराव सोनवणे (वय ३३, रा. उंडवडी सुपे, ता. बारामती) असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी नयुम गनीम सय्यद (रा. सोनवडी सुपे, ता. बारामती) यांच्याविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मनीषा दीपक सोनवणे यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोनवडी सुपे येथे नयुम सय्यद याने दीपक यांना यांना दि.२० जूनला बोलावले होते. त्यानुसार दीपक तेथे गेले. त्यावेळी सय्यद याने तीन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून दीपक यांना मारहाण केली. दरम्यान, याबाबत संतोष वावगे यांनी दीपकच्या कुटुंबीयांना याबबात माहिती दिली. कुटुंबीय घटनास्थळी पोहाचल्यानंतर दीपकच्या डोक्याला मार लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी बारामतीच्या महिला रुग्णालयात नेहले. पुढील उपचारांसाठी ससूनला हलविण्यात आले. परंतु दि.२४ जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी नयुम सय्यद याच्या विरोधात खूनासह अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Out of prejudice, Bigarya committed the murder of a bricklayer