शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सराइताकडून २६ घरफोड्या उघडकीस, १७ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 02:41 IST

गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस कर्मचारी गजानन सोनुने यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी हर्षद पवार व दिनेश देशमुख यांना पकडले़

पुणे : मुुंबई, कोल्हापूर, ठाण्यासह पुण्यात यापूर्वी ४० घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट १ ने पकडून त्याच्याकडून २६ घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत़ हर्षद ऊर्फ पक्या गुलाब पवार (वय २४, रा़ निकटेवस्ती, घोटावडे फाटा, पिरंगुट, ता़ मुळशी) व त्याचा साथीदार दिनेश मधुकर देशमुख (वय ३८, रा़ लक्ष्मी सोसायटी, रुपीनगर, तळवडे, निगडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़ त्यांच्याकडून ५२२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८८० ग्रॅम चांदीचे दागिने, मोटारसायकल असा १७ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांनी दिली़ गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस कर्मचारी गजानन सोनुने यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी हर्षद पवार व दिनेश देशमुख यांना पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार हडपसर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर केलेल्या चौकशीत गेल्या एक ते दीड वर्षात त्यांनी पुणे शहरातील हडपसर, विश्रांतवाडी, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, अलंकार, बिबवेवाडी, कोरेगाव पार्क, मुंढवा, हिंजवडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २६ घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले़ हर्षदवर यापूर्वी ४० घरफोड्याचे गुन्हे असून, दिनेश यावर यापूर्वीचे २ गुन्हे आहेत़ तुरुंगात असताना दोघांची ओळख झाली़ तुरुंगातून बाहेर आल्यावर ते प्रामुख्याने दिवसा घरफोड्या करीत होते़ त्यांनी सोलापूर, चाकण, लोणीकंद व इतर ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, पोलीस कर्मचारी गजानन सोनुने, प्रकाश लोखंडे, रिजवान जिनेडी, अशोक माने, प्रशांत गायकवाड, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, तुषार माळवदकर, अनुराधा धुमाळ, उमेश काटे, तुषार खडके, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, सचिन जाधव, इम्रान शेख यांनी केली आहे़स्वस्तात वाहने देण्याच्या बहाण्याने २७ लाखांची फसवणूकपुणे : कमी किमतीत वाहने देण्याचे आमिष दाखवून बुकिंगसाठी २७ लाख १० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एकास अटक केली आहे. अझर रौख शेख (वय २५, रा. पेन्शनवाला मस्जिदसमोर, रास्ता पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी हनिफ ऊर्फ आरिफ दस्तगिर सय्यद (वय ३४, रा. कोंढवा) याला अटक केली आहे. रोहित गणेश गायकवाड (वय २५, रा. ताडीवाला रस्ता) यांनी बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादी यांना कमी किमतीत दुचाकी वा चारचाकी वाहने देण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ७ ते ८ लोकांकडून वाहनांच्या बुकिंगसाठी ३० जानेवारी ते २९ सप्टेंबरदरम्यान १५ लाख ५० हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. मात्र वाहने न देता फसवणूक केली. वाहन न मिळाल्याने फिर्यादींकडे बुकिंगसाठी टोकन दिलेल्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यामुळे फिर्यादी यांचे वडील गणेश गायकवाड (वय ५६) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी फिर्याद देण्यात आली आहे. फसवणुकीची रक्कम २७ लाख १० हजारांपर्यंत पोहोचल्याचे तपासातून समोर आले आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी कोणाला फसवले आहे का? याच्या तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Puneपुणे