बालविकास मंचाच्या सहयोगाने स्पर्धेचे आयोजन
By Admin | Updated: November 8, 2014 23:54 IST2014-11-08T23:54:40+5:302014-11-08T23:54:40+5:30
‘अजमेरा इंटर स्कूल प्रीमिअर लीग’च्या माध्यमातून शालेय खेळाडूंना आपल्या खेळाची चमक दाखविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बालविकास मंचाच्या सहयोगाने स्पर्धेचे आयोजन
पुणो : लोकमत बालविकास मंच यांच्या सहयोगाने व द स्पोर्ट्स गुरुकुल यांच्या वतीने ‘अजमेरा इंटर स्कूल प्रीमिअर लीग’च्या माध्यमातून शालेय खेळाडूंना आपल्या खेळाची चमक दाखविण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या 11 नोव्हेंबर्पयत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्याथ्र्याना नावनोंदणी करता येणार आहे. तर येत्या 12 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत विविध खेळांचे वैयक्तिक व सांघिक सामने आयोजित केले जाणार आहेत.
‘लोकमत बालविकास मंच’तर्फे शालेय विद्याथ्र्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेहमीच विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून इंटर स्कूल प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले असून, त्या अंतर्गत बास्केट बॉल, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, स्केटिंग, फुटबॉल, बुद्धिबळ या खेळांच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीजवळील विद्या प्रतिष्ठानच्या नांदेड सिटी पब्लिक स्कूलमध्ये ही स्पर्धा होणार आहे. याच शाळेत विद्याथ्र्याना नावनोंदणी करता येणार आहे.
पुणो जिल्ह्यातील विविध शाळांनी व विद्याथ्र्यानी या स्पर्धासाठी आपला सहभाग नोंदवला असून, 6 ते 16 वयोगटातील खेळाडूंना वैयक्तिक आणि सांघिक नोंदणी करता येणार आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी फुटबॉल व टेनिसच्या स्पर्धा एस.पी. कॉलेजच्या मैदानावर तर नांदेड सिटी पब्लिक स्कूलच्या मैदानावर इतर सर्व स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्यात येत्या 14 नोव्हेंबरला स्केटिंग, 15 व 16 नोव्हेंबरला बुद्धिबळ स्पर्धा, 16 नोव्हेंबरला क्रिकेट व बास्केटबॉल, 19 व 20 नोव्हेंबरला टेबल टेनिस स्पर्धाचे आयोजन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
पारितोषिक वितरण 21 नोव्हेंबरला
4या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 21 नोव्हेंबर रोजी होणार असून, स्पर्धेत सहभाग घेणा:या प्रत्येक खेळाडूला मेडल दिले जाणार आहे. तसेच खेळाडूंना या स्पर्धेतून विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध आहे. 2014-15 साठी बालविकास मंचमध्ये नव्याने सहभागी होणा:या सभासदांना बालविकास मंचचे ओळखपत्र दाखवून कोणत्याही एका खेळात मोफत प्रवेश दिला जाणार आहे.