चंद्रशेखर देशपांडे स्मृती राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:16 IST2021-02-17T04:16:03+5:302021-02-17T04:16:03+5:30
स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने २०१८ मध्ये प्रतिष्ठानची पुणे येथे स्थापना करण्यात आली. जुनी संगीत नाटके उभरत्या कलाकारांच्या ...

चंद्रशेखर देशपांडे स्मृती राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन
स्वरराज छोटा गंधर्व यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने २०१८ मध्ये प्रतिष्ठानची पुणे येथे स्थापना करण्यात आली. जुनी संगीत नाटके उभरत्या कलाकारांच्या साथीने पुन्हा रसिकांना पुन:प्रत्ययाचा आनंद देणे आणि मराठी संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमातील पुढचे पाऊल म्हणून प्रतिष्ठानतर्फे हौशी कलाकारांसाठी या वर्षीपासून नाट्यगीतगायन स्पर्धेचे राज्यस्तरावर आयोजन करण्यात येत असल्याचे केळकर आणि अवचट यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ कलावंत अशोक अवचट, चंद्रशेखर देशपांडे यांचे चिरंजीव सुनील देशपांडे उपस्थित होते.
स्पर्धेत दोन्ही गटांत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि दोन उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ३०००/-, द्वितीय क्रमांकासाठी २०००/-, तृतीय क्रमांकासाठी १०००/- रुपये आणि उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी ५००/- रुपये आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नाट्यगीत सादर करण्याचा कालावधी ५ ते ७ मिनिटे असा आहे. स्पर्धकाने प्रवेश अर्जाबरोबर तीन नाट्यगीते नमूद करायची आहेत. त्यांपैकी परीक्षक सांगतील ते नाट्यगीत स्पर्धकाला सादर करावे लागणार आहे. नावनोंदणीची अंतिम मुदत १५ मार्च आहे.