मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:27 IST2020-11-26T04:27:52+5:302020-11-26T04:27:52+5:30
पुणे : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम ...

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
पुणे : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
दिनांक 18 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 या दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये विशेष मोहिमांचे आयोजन करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने मोहिमेदरम्यान पुणे जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघस्तरावर दिनांक 5, 6, 12 व 13 डिसेंबर रोजी शनिवार व रविवार या सुट्टयांच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या, कृष्ण धवल छायाचित्र असलेल्या मतदारांचे रंगीत छायाचित्र घेण्यात येतील.
सर्व नागरिकांनी कुटूंबातील मयत झालेल्या व्यक्ती, दुबार नावे असलेले मतदार व स्थलांतरीत झालेल्या मतदारांनी विशेष मोहिमेच्यावेळी फॉर्म क्रमांक 7 भरुन देऊन मतदार यादीतील नावांची वगळणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही डॉ.देशमुख यांनी केले आहे.