‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस २०१६’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 01:20 IST2016-03-22T01:20:49+5:302016-03-22T01:20:49+5:30

गेल्या चार वर्षांपासून लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करते.

Organizing 'Pune Property Showcase 2016' | ‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस २०१६’चे आयोजन

‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस २०१६’चे आयोजन

पुणे : गेल्या चार वर्षांपासून लोकमत पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करते. यंदाचे या उपक्रमाचे हे यशस्वी पाचवे वर्ष असून, यामध्ये पुण्यातील ३५ बांधकाम व्यावसायिकांचे २०० हून अधिक गृहप्रकल्प यात पाहता येणार आहेत.
हे भव्य गृहप्रकल्प प्रदर्शन शनिवार, दि. २६ व रविवार दि. २७ मार्च २०१६ रोजी गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे होणार असून, सदर प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य असून, प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ आहे. या गृह प्रदर्शनामध्ये पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे पुण्यातील निवडक प्रकल्प पाहता येणार आहेत. या गृह प्रदर्शनात अ‍ॅफोर्डेबल होम्स, लक्झुरिअस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, ओपन प्लॉट असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय संभाव्य ग्राहकांना पाहता येणार आहेत़ पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये वेळेची व पैशाची बचत होणार आहे़ आपल्या स्वप्नातील व आपल्या गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे इच्छुक ग्राहकांना पाहता येणार आहेत़
गुढीपाडव्याचा सण लक्षात घेता अनेक बांधकाम व्यावसायिकांनी नवनवीन आकर्षक योजना आखलेल्या असून, या प्रदर्शनामध्ये घराचे
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये अनेक इच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करत हे प्रदर्शन यशस्वी केले आहे.
पुण्याचा विस्तारणारा परिघ, घराच्या वाढत्या किमती, उच्च जीवन शैली, शिक्षणाचे नवनवीन पर्याय, नोकरी व उद्योगातील आधुनिक संधी यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांतून लोकांचा पुण्याकडे येण्याचा कल नेहमीच असतो़ पुण्यातील प्रॉपर्टीमधील गुंतवणूक ही
आजवर अनेकांना फायदेशीर ठरल्यामुळे अनेकांनी राहत्या घरासोबत सेकंड होम म्हणून पुण्याचाच विचार केला जातो़ (प्रतिनिधी)

Web Title: Organizing 'Pune Property Showcase 2016'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.