पुणे हेरिटेज फेस्टिव्हलचे आयोजन
By Admin | Updated: January 28, 2017 01:56 IST2017-01-28T01:56:40+5:302017-01-28T01:56:40+5:30
जनवाणी व इन्टॅक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे हेरिटेज फेस्टिव्हलचे ३ ते १२ फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

पुणे हेरिटेज फेस्टिव्हलचे आयोजन
पुणे : जनवाणी व इन्टॅक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे हेरिटेज फेस्टिव्हलचे ३ ते १२ फेब्रुवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे यंदाचे ६वे वर्ष असून महोत्सवाचा उद्घाटन सोहळा २ फेबु्रवारी रोजी एमडीसी आॅडिटोरियम, यशदा येथे होणार आहे.
या महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटनामध्ये प्रथमच अर्ध्या दिवसाची शहरी वारसा परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये शहरी वारशाचे भविष्य आणि वारसा जतन विकास योजनांचे कायदे व संधी तसेच वारशांच्या संवर्धनातील कोंडी या विषयावर केस स्टडी, प्रेझेंटेशन व पॅनल डिस्कशनद्वारे चर्चा होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सरकार, यूडीडीचे मुख्य सचिव नितीन करीर असतील. ही परिषद सर्वांसाठी खुली आहे.