तळेगाव ढमढेरे येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST2021-04-16T04:09:57+5:302021-04-16T04:09:57+5:30

शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार महेश ढमढेरे, शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव व महाविद्यालयाचे ...

Organizing blood donation camp at Talegaon Dhamdhere | तळेगाव ढमढेरे येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन

तळेगाव ढमढेरे येथे रक्तदान शिबिराचे आयाेजन

शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार महेश ढमढेरे, शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले यांच्या हस्ते झाले. या वेळी ३६ जणांनी रक्तदान केले.

यावेळी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य मनोज अल्हाट, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील ढमढेरे, महेश भुजबळ, माऊली अल्हाट, अशोक भुजबळ,शि रूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संकेत गवारी, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष अरुणा मोहोळ, रामदास थोरात, सचिन पंडित आदी उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन ससून रुग्णालय पुणे यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय वाबळे व डॉ. मनोहर जमदाडे यांनी केले.

१५ तळेगाव ढमढेरे रक्तदान शिबिर

तळेगाव ढमढेरे येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करताना मान्यवर.)

Web Title: Organizing blood donation camp at Talegaon Dhamdhere