रावणगावला रक्तदान शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST2021-05-17T04:08:52+5:302021-05-17T04:08:52+5:30
कै. विनोद मानसिंग गाढवे आणि कै. प्रल्हाद नामदेव आटोळे यांच्या स्मरणार्थ या रक्तदान शिबिराचे आयोजन रावणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ...

रावणगावला रक्तदान शिबिराचे आयोजन
कै. विनोद मानसिंग गाढवे आणि कै. प्रल्हाद नामदेव आटोळे यांच्या स्मरणार्थ या रक्तदान शिबिराचे आयोजन रावणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासो भोपाळ, अमर गाढवे आणि नंदादेवी येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश कोकणे यांनी केले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रफुल्ल बिडवे यांच्या हस्ते केले. या वेळी डॉ. बिडवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग मेरगळ यांनी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक नारायण आटोळे, संपत आटोळे, लक्ष्मण रांधवण, रावणगावचे माजी सरपंच शिवाजी आटोळे उपस्थित होते. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुक्ताई ब्लडबँक इंदापूर यांच्या वतीने सौरभ ननवरे, अक्षय राऊत, अभिषेक पाटील आणि उमेश राऊत यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले.