फुले, आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:09 IST2021-04-14T04:09:15+5:302021-04-14T04:09:15+5:30

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे मार्केट यार्ड येथील ...

Organizing blood donation camp on the occasion of Phule, Ambedkar Jayanti | फुले, आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

फुले, आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलतर्फे मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल शहराध्यक्ष संतोष नांगरे यांनी आयोजन करून रेड प्लस रक्तपेढीच्या संयोगाने राबविण्यात आले.

या वेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, पर्वती विधानसभा अध्यक्ष नितीन कदम, शिवाजी गदादे, पंडित कांबळे, राकेश कामठे, शशिकांत तापकीर, दिलीप अरुंदेकर, राहुल पोटे, प्रशांत कुदळे, गौरव कापरे, गणेश ससाणे, ओंकार भोजने, सुशांत ढमढेरे, रुपेश आखाडे, साहिल तांबोळी, विठ्ठल ढेबे, संतोष चव्हाण, मिनाझ शेख, संदीप भावेकर, प्रवीण राठोडकर, शिवम इभाड, आकाश चिंचवले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Organizing blood donation camp on the occasion of Phule, Ambedkar Jayanti