चाकणला रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST2021-07-15T04:09:53+5:302021-07-15T04:09:53+5:30

या शिबिरासाठी माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ...

Organizing blood donation camp for Chakan on Sunday | चाकणला रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

चाकणला रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

या शिबिरासाठी माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, शिवसेना तालुका प्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, गणेश सांडभोर, प्रकाश वाडेकर, किरण मांजरे, शहराध्यक्ष महेश शेवकरी, लक्ष्मण जाधव, सुभाष मांडेकर, किसन नवले आदी उपस्थितीत राहणार आहेत.

स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे नारायण करपे, विशाल बारवकर, रत्नेश शेवकरी, अतुल सवाखंडे तसेच पिंपरी चिंचवड ब्लड बँकेचे प्रकाश डिंबळे यांच्या सहकाऱ्याने हे रक्तदान शिबीर संपन्न होणार.चाकण पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी या शिबिरात आपले योगदान द्यावे, असे आवाहन शहराध्यक्ष महेश शेवकरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रकांत मांडेकर - ९०११२२३३११ व नितीन गोरे - ९८२२२६९९९० यांच्याशी संपर्क साधावा.

-------------------------------------------------------

Web Title: Organizing blood donation camp for Chakan on Sunday