शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

पार्किंग धोरणाच्या विरोधात संघटनांची तीव्र आंदोलने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 16:36 IST

रस्त्यावर लागणाऱ्या प्रत्येक वाहनाला या धोरणानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्याविरोधात वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमहापौरांना प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले. आयुक्त कुणाल कुमार यांनाही खेळण्यातील गाडी भेट

पुणे: विविध राजकीय पक्ष, संस्था आणि  संघटना यांनी एकत्र येत महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शहरातील वाहतुक पार्किंग शुल्क आकारणी धोरणाच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी भाजपाच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या. सुरक्षा रक्षकांनी दोनही प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पालिकेसमोरच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आले. विविध राजकीय पक्ष स्थायी समितीने मंजूर केलेले वाहनतळ धोरण अंतिम मान्यतेसाठी म्हणून शुक्रवारी तातडीने स्थायी समितीसमोर आणण्यात आले. रस्त्यावर लागणाऱ्या प्रत्येक वाहनाला या धोरणानुसार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्याविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याचेच प्रत्यंतर पालिकेसमोरच्या आंदोलनात आले. संभाजी ब्रिगेड, पतितपावन, भीम छावा आदी संघटनांनी आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बैल जोडलेला मोठा गाडा घेऊन आले होते. काहींनी टांगा आणला होता.दोन्ही प्रवेशद्वारावर गर्दी झाली होती. घोषणांनी पालिकेचा परिसर दणाणला होता.पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना ही आत जाण्यास मनाई केली.त्यांच्या उद्धट व आडमुठेपणाच्या वागण्यामुळे वाद सुरू झाला. त्याचा फटका आजी माजी महापौरांना देखील बसला. त्यांना काहीकाळ महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ताटकळत उभे राहावे लागले. सभेचे कामकाज सुरू होताच शिवसेना व मनसेच्या सदस्यांनी भाजपाच्या निषेधाच्या घोषणा देत सभाग्रुहात गोंधळ केला. मनसेचे वसंत मोरे, साईनाथ बाबर डोक्यावर खेळण्यातील वाहने बांधून आले होते. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले व अन्य सदस्य काळे शर्ट टोप्या परिधान करून आले होते.पुणेकरांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या भाजपाचा निषेध करणार्या घोषणा देण्यात होत्या.मनसे व शिवसेनेने मुक्ता टिळक यांना निषेध म्हणून खेळण्यातील वाहने भेट दिली. आयुक्त कुणाल कुमार यांनाही खेळण्यातील गाडी देण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकParkingपार्किंगBJPभाजपा