वेळापत्रक बदलासाठी संघटनाच आग्रही
By Admin | Updated: November 16, 2016 03:32 IST2016-11-16T03:32:26+5:302016-11-16T03:32:26+5:30
राज्य मंडळाच्या दहावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा, अशी सूचना गेल्या १५ दिवसांत राज्यातील एकाही पालक, विद्यार्थ्याने मंडळाकडे

वेळापत्रक बदलासाठी संघटनाच आग्रही
पुणे : राज्य मंडळाच्या दहावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा, अशी सूचना गेल्या १५ दिवसांत राज्यातील एकाही पालक, विद्यार्थ्याने मंडळाकडे केली नाही. दोन पेपरमध्ये सुट््या नसल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येईल, असे सांगत केवळ लोकप्रतिनिधी व संघटनांकडूनच वेळापत्रक बदलाचा आग्रह धरला जात होता, अशी माहिती त्यामुळे समोर येत आहे.
राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करता यावे, या उद्देशाने राज्य मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजित वेळापत्रक आॅक्टोबर महिना अखेरीस प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच विद्यार्थी,पालक व शिक्षणक्षेत्राशी निगडित घटकांकडून वेळापत्रकाविषयी सूचना मागविण्यात आल्या होत्या.
राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुकामुळे फेब्रुवारी / मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या मंडळाच्या परीक्षा मागील वर्षाच्या तुलनेत एक आठवडा पुढे गेल्या. विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरदरम्यान एक दिवस सुटी दिली जात होती. मात्र, समाजशास्त्र विषयाच्या २ पेपरसाठी विद्यार्थ्यांना एकही सुटी दिली गेली नाही. परिणामी, काही संघटनांनी राज्य मंडळाकडे वेळापत्रकामध्ये बदल करण्याची मागणी केली. परंतु, नॅशनालिस्ट स्टुडंट काँग्रेस आणि अमरावती येथील शिक्षक महासंघ या दोन संघटनांनी आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीच मंडळाकडे सूचना पाठविल्या आहेत.