शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सेंद्रिय शेतीचा ‘सिक्कीम पॅटर्न’ राबविणार : कृषी आयुक्त सुहास दिवसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 13:02 IST

सिक्कीम पॅटर्नच्या पार्श्वभूमीवर राज्यातही सेंद्रिय शेतीची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल.

ठळक मुद्दे जागतिक बँकेच्या मदतीने भाजीपाला व फळपिकासाठी कार्यक्रम

बारामती : शंभर टक्के सेंद्रिय राज्य बनलेल्या सिक्कीम राज्याचा संपूर्णपणे अभ्यास करण्यात येणार आहे. सिक्कीम पॅटर्नच्या पार्श्वभूमीवर राज्यातही सेंद्रिय शेतीची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल. शासनाची सर्टिफाईड यंत्रणा करण्यासाठी वेगाने प्रयत्न केले जातील. जागतिक बँकेच्या मदतीने स्मार्ट शेती योजनेतून भाजीपाला व फळपिकासाठी विशेष कार्यक्रम राबविला जाईल, असे राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.बारामतीसह अन्य परिसरातील अन्य शेतकºयांनी उभारलेल्या  महा आॅरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनच्या हडपसर येथील मेगा सेंटरमधील कार्यालयाचे उद्घाटन दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दिवसे म्हणाले, सेंद्रिय शेतीसाठी राज्यात स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. तसेच,तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण सेंद्रिय व विषमुक्त शेती करण्यासाठी लागणारी संपूर्ण मदत करून शेतकºयांनी पिकविलेला विषमुक्त माल ‘मार्केट लिंक ’करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी  शेतकºयांना सर्वतोपरी मदत करणार आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, सातारा जिल्हा कृषी अधीक्षक सुनील बोरकर, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अनिल देशमुख, डॉ. बाळासाहेब हरपळे, सुदाम इंगळे आदी उपस्थित होते.‘मोर्फा’चे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ‘ सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाºया शेतकºयांना तांत्रिक मार्गदर्शन व सेंद्रिय उत्पादकांना मार्केट लिंक करणे, तसेच प्रश्न शासनापुढे मांडणेसाठी ‘मोर्फा ’ची स्थापना केली आहे. सेंद्रिय शेती करणाºयांना सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी शासनाने सर्वतोपरी मदत करावी, सेंद्रिय शेती अभियान राज्यभर राबवावे,पुढील काळात थर्ड पार्टी आॅरगॅनिक सर्टिफिकेशन साठी शासनाने मदत करावी. कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे व माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी मनोगत  व्यक्त केले. यावेळी उमेश मगर, नंदा भुजबळ, नवनाथ गरुड, सागर पाटील, हेमंत सोमवंशी, सतीश देशमुख, मिलिंद चव्हाण, ऋषिकेश गायकवाड, आकाश बांगर, अजिंक्य चव्हाण, रणजित जगताप, नीलकंठ जाधव आदी उपस्थित होते. आभार मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे यांनी मानले. 

टॅग्स :BaramatiबारामतीagricultureशेतीFarmerशेतकरीsikkimसिक्किम