शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका रूग्णालयांच्या गलथान कारभारामुळे सामान्य पुणेकरांचा जीव धोक्यात      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 17:26 IST

नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी सभागृहात डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळे प्रस्तुतीसाठी आलेल महिलेचा व बाळाचा मृत्यू झाला ही अत्यंत खेदाची गोष्ट असून संबंधित डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्याची मागणीचा प्रश्न उपस्थित केला.

ठळक मुद्देराजीव गांधी रूग्णालयातील प्रकारानंतर सभागृहात तीव्र पडसाद डॉक्टर निलंबित करण्याचा निर्णय    

पुणे: महापालिकेच्या आरोग्य प्रमुखाचे पद तीन वर्षांपासून रिक्त आहे.अनेक रुग्णालयात डॉक्टरची कमतरता, वेळेवरऔषधे उपलब्ध नाही,स्वच्छतेचा अभाव यांसारख्या बाबींकडे महापालिका प्रशासन वारंवार दुर्दैेवी घटना घडून देखील अशा रुग्णालयांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. महापालिका रूग्णालयातील गलथान कारभारामुळे सामान्य पुणेकरांचा जीव मात्र,धोक्यात आला आहे,अशा संतप्त प्रतिक्रिया महापालिकेच्या सभागृहात उमटल्या.   येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉक्टर वेळेवर न आल्याने प्रसुतीसाठी आलेल्या आई व बाळाचा मृत्यू झाला होता. यासंबंधित डॉक्टराला त्वरित निलंबित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. ती मान्य करत तेथील संबंधित डॉक्टरवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली. येरवडा येथील महापालिकेच्या राजीव गांधी रूग्णालयामध्ये प्रस्तुतीसाठी आलेल्या महिलेला डॉक्टर नसल्याने वेळेवर उपचार मिळाले नाही. नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी सभागृहात डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळे प्रस्तुतीसाठी आलेल महिलेचा व बाळाचा मृत्यू झाला ही अत्यंत खेदाची गोष्ट असून संबंधित डॉक्टरवर त्वरित कारवाई करण्याची मागणीचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सर्व सदस्यांनी प्रामुख्याने महिला सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. स्मार्ट शहर, मेट्रो सिटी म्हणून मिरवणाºया पुणे शहरांमध्ये २१ व्या शकतात वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमावावा लागतो ही अत्यंत दु:खद गोष्ट आहे. पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकेला आरोग्य प्रमुख मिळत नाहीत. शहरातील महापालिकेच्या सर्वच रूग्णालयाची वाईट स्थितीत आहेत. डॉक्टर,तज्ञ डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी मिळत नाही. रूग्णालयाची सुरक्षाचे प्रश्न ऐरणीवर असून कोट्यवधी रूपयांच्या मशिन उपलब्ध करून दिल्या पण वापरणारे तज्ज्ञ लोक नसल्याने पडून आहेत. याबाबत सत्ताधारी सदस्यांसह सर्वांनी प्रचंड तीव्र शब्दात निषेध केला. महापालिकेच्या रूग्णालयाचा कारभारा बाबत विरोधी सदस्य संजय भोसले, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला व सत्ताधारी भाजपला धारेवर धरले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाYerwadaयेरवडाRajiv Gandhi hospital Yerawadaराजीव गांधी हॉस्पिटल येरवडा