कनेरसर प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:26+5:302020-11-28T04:07:26+5:30

कनेरसर ( ता.खेड )येथील मतिमंद मुलीवरील बलात्कार प्रकरणी संदिग्धता वाटल्याने व तुकाराम दामोदर दौंडकर यांनी १६४ कलमा अंतर्गत खेड ...

Order to re-investigate the Kanersar case | कनेरसर प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश

कनेरसर प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश

कनेरसर ( ता.खेड )येथील मतिमंद मुलीवरील बलात्कार प्रकरणी संदिग्धता वाटल्याने व तुकाराम दामोदर दौंडकर यांनी १६४ कलमा अंतर्गत खेड न्यायालयात संशयित आरोपीला गैरकृत्य करताना रंगेहाथ पडल्याचे जबाब यामुळे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.आश्रमात दाखल करण्याअगोदर पोलीस स्टेशनला तक्रार न देणे.गुन्हा दाखल करण्याअगोदर आश्रमात गेलेल्या व्यक्तीच्या व्हायरल ऑडियो क्लीपमध्ये संशयित आरोपीचा असलेला उल्लेख, गावामध्ये आरोपी सोडून इतर व्यक्तीवरच गुन्हा दाखल झाल्याची चर्चा याबाबी पाहून तसेच तपासाधिकारी संशयित आरोपी व त्याचे वडिलांना पाठीशी घालत असल्यामूळे टाव्हरे यांनी ॲड.शैलेश मोरे यांच्या मार्फत रिट याचिका दाखल केली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाने सुद्धा अशोकराव टाव्हरे यांच्या तक्रारीनुसार दावा दाखल करून घेतला आहे. संशयित आरोपीने बलात्कार केल्याने त्याच्यावर पाॅक्सो कायद्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली होती.

Web Title: Order to re-investigate the Kanersar case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.