भामा आसखेड धरणातील अतिक्रमणाच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:15+5:302021-02-05T05:11:15+5:30

कालवा सल्लागार समितीची बैठक नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी पाटबंधारे विभागाकडून पूर्वी दिलेल्या ...

Order for inquiry into encroachment of Bhama Askhed dam | भामा आसखेड धरणातील अतिक्रमणाच्या चौकशीचे आदेश

भामा आसखेड धरणातील अतिक्रमणाच्या चौकशीचे आदेश

कालवा सल्लागार समितीची बैठक नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी पाटबंधारे विभागाकडून पूर्वी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील बहुतेक धरण क्षेत्रात झालेल्या अतिक्रमणांबाबत काय कारवाई करण्यात आली. यावर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणक्षेत्रात एका आरक्षित (संपादित) जागेवर सपाटीकरण करून मोठे फार्महाऊस उभारण्यात आले आहे. हे फार्म हाऊस यापूर्वी अनेकदा वादग्रस्त ठरले आहे. यामुळे फार्महाऊसच्या मोकळ्या जागेच्या परिसरात छोटे छोटे रो हाउस उभारण्यात आली आहेत.या फार्म हाऊसकडे जाण्यासाठी धरणाच्या पाण्यात मुरूम - मातीचा भराव करून रस्ता बनवून राजरोसपणे या रस्त्याचा वापर केला जात आहे.अशीच अवस्था जिल्ह्यातील इतर धरण क्षेत्रातसुद्धा आहे. कामगार कॉलनीच्या जागेवर खासगी बांधकामे होत आहेत, असे निदर्शनास आणून दिले.

मोहिते पाटील यांनी केलेल्या मागणीचा विचार करून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या क्षेत्रातील अतिक्रमणांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश कालवा सल्लागार समितीला दिले आहेत.

भामा आसखेड धरणाच्या पाण्यात भराव टाकून केलेला रस्ता.

Web Title: Order for inquiry into encroachment of Bhama Askhed dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.