शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मुदतीपूर्वीच अखर्चित निधी वर्गचा आदेश; प्रहार अपंग क्रांती संघटनेचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:41 IST

निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असतानाही अपंग कल्याण निधी अंतर्गत २०१६-१७ मधील असणारा अखर्चित निधी मुदतीपूर्वीच जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा आदेश दिला आहे, तो निर्णय चुकीचा आहे, असा आरोप प्रहार अपंग क्रांती संघटनेने केला आहे.

ठळक मुद्देनिर्णय त्वरित बदलावा; अन्यथा तीव्र आंदोलन करणार : प्रहार अपंग क्रांती संघटनासमाजकल्याण आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना मागविण्यात येणार : संदीप कोहिनकर

पुणे : निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असतानाही अपंग कल्याण निधी अंतर्गत २०१६-१७ मधील असणारा अखर्चित निधी मुदतीपूर्वीच जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा आदेश दिला आहे, तो निर्णय चुकीचा आहे, असा आरोप प्रहार अपंग क्रांती संघटनेने केला आहे. हा निर्णय त्वरित बदलावा; अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव व पुणे जिल्हाध्यक्षा सुरेखा ढवळे दिला आहे़सन २०१६-१७ मधील निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असते. मात्र चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार केला आहे़  याचा फटका जिल्ह्यातील अपंगांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपंग त्यांच्या हक्कांपासून वंचित राहत आहेत़  तरी आपण हे परिपत्रक तत्काळ रद्द करावे. तीन टक्के निधी खर्च केल्याबाबतची माहिती कार्यालयात नसताना चुकीचे पत्र काढणे योग्य नाही, असेही संघटनेने जिल्हा परिषदेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे़  जिल्हा परिषदेप्रमाणे पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी त्यांच्या उत्पन्नाच्या तीन टक्के निधी अपंगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे़ असे असतानाही उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सन २०१६-१७ मधील अपंग कल्याण निधी अखर्चित निधी वर्ष वर्षभरात संपत नसेल तर जि. प. च्या खात्यात जमा करण्यास कळविले आहे.समाजकल्याण विभागाकडून सूचना मागवणार.२१ सप्टेंबर २०१६ रोजी शासनाने अपंग कल्याण निधी खर्च न झाल्यास जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा, असे परिपत्रक काढले आहे. त्याचीच अंमलबजावणी करण्यात आली आहे़  मात्र तरीही याबाबत समाजकल्याण आयुक्तांकडून मार्गदर्शक सूचना मागविण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले.

टॅग्स :Prahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांतीPuneपुणे