अक्षदाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By Admin | Updated: July 5, 2014 23:23 IST2014-07-05T23:23:35+5:302014-07-05T23:23:35+5:30

भिगवण, तक्रारवाडी (ता.इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Order to file murder case against Akshar's death | अक्षदाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अक्षदाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बारामती : भिगवण, तक्रारवाडी   (ता.इंदापूर) येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच, मुलीच्या आईने तिला पळवून नेलेल्या सराईत गुन्हेगार तरुणाचे नाव भिगवण पोलिसांना दिले होते. त्याची गांभीर्याने दखल न घेणा:या पोलिसांचीदेखील चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे संकेत उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम यांनी दिली.
‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शनिवारी खळबळ उडाली. या वृत्ताची तातडीने दखल घेण्यात आली. तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करणा:या कर्मचा:यांची खातेनिहाय चौकशी करण्यात  येणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जवळपास 21 दिवसांनंतर आरोपीवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. या मुलीच्या मृत्यूप्रकरणी आरोपी राहुल सपकाळे यास अटक केली आहे. मुलीच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर कारण स्पष्ट होणार आहे, तरीदेखील खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 
 मयत अक्षदा बाळासाहेब पाटोळे ही अल्पवयीन मुलगी 17 जूनपासून बेपत्ता होती. 1 जुलै रोजी तिचा खालापूर, रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत गुढ कायम आहे. या प्रकरणी राहुल सपकाळे यांस अटक करण्यात आली आहे. तिची आई अनिता पाटोळे यांनी पोलिसांनी वेळीच लक्ष न दिल्याने अक्षदा हिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. आपल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती, तर अक्षदा आज जिवंत असती, असेदेखील त्यांचे म्हणण्ेा आहे. 
याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम यांनी सांगितले, की वालचंदनगर पोलिसांना खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अक्षदा हिचा शवविच्छेदन अहवाल मागवण्यात आला आहे. पोलिसांनी दखल घेतली असती, तर मुलीचा जीव वाचला असता. तक्रारीची वेळेत दखल न  घेणा:या पोलिसांची चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
 .. टोलवा-टोलवीमुळे मुलीचा जीव गेला
4माङया मुलीचे व आरोपीचे कोणतेही काही संबंध नव्हते. मात्र, त्याने लग्नासाठी तिला मागणी घातली होती. आरोपी राहुल सपकाळे याची चौकशी केली असता, तो गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचे समजले. त्यामुळे त्याने लगAासाठी घातलेली मागणी आम्ही मान्य केली नाही. अक्षदाला पळवून नेण्याच्या 1 दिवस अगोदर आरोपीने धमकी दिली होती. त्याची देखील माहिती मी पोलिसांनी दिली. त्यानेच पळवून नेल्याची माहिती दिली. मात्र, भिगवण पोलिसांनी टोलवा-टोलवी केली, त्यामुळे माङया मुलीचा जीव गेला, अशी प्रतिक्रिया मुलीच्या आईने ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.  

 

Web Title: Order to file murder case against Akshar's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.