शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महिला दक्षता समित्यांची पुनर्स्थापना व बळकटीकरणाचे पोलीस महासंचालकांनी दिले आदेश; कोरोनामुळे थांबलं होतं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 19:12 IST

कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० मध्ये पहिला लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर महिला दक्षता समितींसह सर्व समित्यांच्या बैठका घेणे बंद करावे लागले होते.

पुणे : महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत महिला तक्रार स्पष्टपणे मांडण्यास पुढे येत नाहीत, अशा वेळी पोलीस ठाणेपातळीवर महिला दक्षता समिती अशा पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची पुनर्स्थापना व बळकटीकरण करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक रश्मी जाधव यांनी हे आदेश काढले आहेत. 

दक्षता समितीतील महिला सदस्य या कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रभावाखाली नसाव्यात, असे सुचविण्यात आले आहे. कोरोना संसर्गांमुळे गेल्या एक वर्षांपासून अशा समितीच्या बैठका घेणे बंद झाले होते. त्या पुन्हा सुरु करण्याचे सूचविण्यात आले आहे.महिला दक्षता समिती पोलीस ठाणे व परिमंडळ स्तरावर पुनश्च कार्यान्वित करण्यात यावी. या महिला दक्षता समितीचा उद्देश हा महिलांच्या संदर्भात विशेषत: विवाहित महिलांच्या अनुषंगाने त्यांच्या संसारात होणार्‍या घरगुती हिंसाचाराबद्दल इतर अत्याचारासंदर्भात पोलीस ठाणे स्तरावर पिडित महिलांना न्याय मिळवून देण्यास मदत करेल. सर्व जातीधर्माचे प्रतिनिधीत्व करणार्‍या महिला सदस्य असाव्यात. समितीमध्ये १० महिला सदस्या असाव्यात.

पोलीस ठाण्याच्या स्तरावर दर आठवड्यामध्ये किमान एकदा महिला दक्षता समितीच्या सदस्यांना बोलावून व त्यांच्या समक्ष अर्जदार व गैरअर्जदार यांना बोलावून घटनेच्या संदर्भामध्ये माहिती घ्यावी व तात्काळ त्यांचे निवारण करावे. जर कौटुंबिक वाद विवाद यांचे निराकरण पोलीस ठाणे स्तरावरील समितीमध्ये झाले नाही तर ते प्रकरण हे परिमंडळ पोलीस अधिकारी स्तरावर कार्यरत असणार्‍या समितीसमोर ठेवण्यात यावे. 

महिला दक्षता समिती ही पोलीस ठाण्याच्या स्तरावर काम करीत असताना फक्त विवाहित महिलांच्या संदर्भातच चर्चा करण्यात येऊ नये, तर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये महिलांच्या अनुषंगाने दाखल होणारे छेडछाडीचे गुन्हे, महिलांवरील लैगिक अत्याचारावरील गुन्हे व पोलिसांनी कोणती व काय कारवाई केली आहे. व काय करणे अपेक्षित आहे. दक्षता समिती सदस्यांची काय भूमिका आहे, यावरही चर्चा व्हावी़ ...कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० मध्ये पहिला लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर महिला दक्षता समितींसह सर्व समित्यांच्या बैठका घेणे बंद करावे लागले होते. महिलांवरील हिंसाचाराच्या घटनेत या काळात काही समस्या असेल तर समितीतील सदस्य महिलांशी संपर्क साधून त्यांच्याशी फोनवरुन सहकार्य घेण्यात येत होते. आता पुन्हा समितीच्या बैठका सुरु करण्यात येतील, असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिलाcorona virusकोरोना वायरस बातम्या