शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी पूर्व कामे योग्यरित्या आणि तातडीने पूर्ण करा: महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 22:41 IST

पावसाळी कामांची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली पाहणी

पुणे : पुणे शहरातील धोकादायक ठिकाणची पावसाळी कामांची महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पाहणी केली. त्यामध्ये जवळपास शहरातील वेगवेगळ्या भागातील नाले रुंदीकरण, खोलीकरण, कल्वर्ट वाढविण्याचे, सीमाभिंत, नाल्याची स्वच्छता, काही ठिकाणी ही कामे बाकी आहेत अशा ठिकाणची कामे त्वरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील विविध भागातील पावसाळी आणि नालेसफाईच्या कामांची पाहणी महापौर मोहोळ यांनी केली. यावेळी उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार,अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार आणि विविध खात्यांच्या प्रमुखांसह प्रभागनिहाय उपस्थिती नगसेवक धीरज घाटे यांची होती.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, 'पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. याची खबरदारी घेऊन प्रशासनाला ताबडतोब उपाययोजना करून कामे मार्गी लावण्याची आदेश यावेळी दिले आहेत. यावेळी रमेश वांजळे चौक वारजे,सोनवणे हॉस्पिटल अरण्येश्वर, मित्र मंडळ चौक, कसबा पेठ, रास्ता पेठ, कात्रज आदी ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी अगोदर झालेल्या कामांचा देखील आढाव घेतला.

शहरातील अनेक ठिकाणच्या कामांना वेग आला असून लोकवस्तीच्या परिसरातून वाहणाऱ्या ओढ्या नाल्याची साफ करण्यात येत आहे. इस्माईल बेकरी नाला परिसरात प्रवाहास अडथळा ठरणाऱ्या अनावश्यक स्टॉर्म वॉटर लाइन्स तोडून काढण्यात आल्या. वारजे येथील रमेश वांजळे चौकात रस्त्यावर पाणी साठून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हायवेवर जागोजागी स्लॅब काढून साफ करण्यात आले आहेत .तसेच नेहरू रस्त्यावर फर्निचर विक्रेते नाल्यात फर्निचर ठेवत असल्याने त्यांच्यावर पालिकेने कारवाई केली आहे .तसेच अरण्येश्वर परिसरातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येत असलेली जलवाहिनी शिफ्ट करण्यात आली आहे.मित्रमंडळ चौकातील आंबिल ओढा शेजारी साने गुरुजी वसाहत परिसरातील अतिृवृष्टीमुळे पडझड झालेल्या सीमा भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे याशिवाय बंदिस्त माणिक नाला मशीनने व ओपन नाला जेसीबी मशीन ने साफ करण्यात आला आहे. 

महापौरांचा दौरा "छा-छु" काम :राष्ट्रवादीचा आरोप पावसाळा सुरू झाल्यानंतर एवढ्या उशिरा जाग आलेली आहे, असे अकार्यक्षम महापौर आणि त्यांचा भोंगळ कारभार लाभला आहे. त्यांचा पाहणी दौरा म्हणजे "छा-छु"काम आहे. महापौरांना आणि सत्ताधारी भाजपला पर्वती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सवाल आहे की एवढ्या उशिरा मंगळवारी (दि. १४) तुम्ही पावसाळा आल्यावर काय पाहणी करणार आणि त्यानंतर काय काम करणार आणि पुणेकरांना काय त्यातून दिलासा देणार? महापौरांच्या पाहणी दौऱ्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्वती मतदार संघाच्या वतीने निषेध करत आहोत.- नितीन कदम,अध्यक्ष पर्वती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौर