शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अनिवार्य मराठीच्या आदेशाला शासनाकडूनच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:01 PM

‘आपलं सरकार’ या पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेची परीक्षा मराठीतून घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यंदाही माध्यम बदलण्यात आलेले नाही.

ठळक मुद्देमुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना : आश्वासनानंतरही माध्यम केवळ इंग्रजीचपात्र उमेदवारांना ११ महिन्यांसाठी दरमहा ४० हजार रुपये शिष्यवृत्ती प्रशासकीय कामकाजात मराठी अनिवार्य केले असताना मुख्यंत्र्यांच्या नावाने असलेल्या योजनेतच मराठीचा वापर नाही

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर अनिवार्य व्हावा, असे परिपत्रक शासनाकडून नुकतेच काढण्यात आले. मात्र, शासनाच्या मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेतूनच या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेच्या परीक्षेचे माध्यम केवळ इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले होते. तक्रारदाराने ‘आपलं सरकार’ पोर्टलवर तक्रार केल्यानंतर पुढील वर्षीपासून परीक्षेचे माध्यम मराठीमध्ये उपलब्ध करुन दिले जाईल, असे सांगूनही या आश्वासनाला हरताळ फासण्यात आला आहे.मुख्यमंत्री फेलोशिप योजनेअंतर्गत सरकारच्या प्रकल्पांमध्ये तरुणांचा सहभाग वाढण्यासाठी प्रयत्न केले जातात. २०१५ पासून सुरु करण्यात आलेल्या अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाअंतर्गत राबवल्या जाणा-या या योजनेमध्ये २० ते २६ वर्षे वयोगटातील युवकांना संधी दिली जाते. फेलोशिपसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर आॅनलाईन परीक्षा घेतली जाते. त्यातून मुलाखतीनंतर ५० जणांची निवड केली जाते. मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांसह गडचिरोली जिल्ह्यातून, तसेच बाहेरच्या राज्यांतूनही या शिष्यवृत्तीसाठी तरुणांचे अर्ज येतात. पात्र उमेदवारांना ११ महिन्यांसाठी दरमहा ४० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. आनंद भंडारे यांनी गेल्या वर्षी या शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईन अर्ज भरला होता.  शिष्यवृत्तीचे आॅनलाईन अर्ज आणि परीक्षा ही केवळ इंग्रजीत होते. त्याबद्दल त्यांनी ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यावर शासनाकडून आलेल्या उत्तरानुसार, योजना राबवण्यासाठी असलेला अल्प कालावधी आणि आॅनलाईन इंटरनेट आधारित संगणकीय प्रणाली पाहता सध्या इंग्रजी माध्यम उपलब्ध करुन देण्यात आले असून, पुढील वर्षीपासून मराठी माध्यम उपलब्ध करुन दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यंदाही परीक्षेचे माध्यम केवळ इंग्रजीतून ठेवण्यात आले आहे. आताच्या मराठी सक्तीच्या नव्या परिपत्रकानुसार, प्रशासकीय कामकाजात मराठी अनिवार्य केले असताना मुख्यंत्र्यांच्या नावाने असलेल्या योजनेतच मराठीचा वापर झालेला नाही. ही शिष्यवृत्ती प्रक्रिया राबविणा-या अधिका-यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार आहे का? की दक्षता अधिकारी नेमला नसल्यामुळे त्यातून सूट मिळणार असेल, तर मग मागच्या वर्षी ‘आपलं सरकार’वर दिलेल्या उत्तराचं काय? की ती ही धूळफेकच म्हणायची, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.-----------अर्ज भरण्याचे माध्यम मराठीत उपलब्ध आहे. मात्र, परीक्षेचे माध्यम अद्याप इंग्रजीतूनच असून मराठीत उपलब्ध करुन देणे शक्य झालेले नाही. सुरुवातीला या शिष्यवृत्ती योजनेचे काम आयबीपीएस या संस्थेला देण्यात आले होते. आता हे काम एमकेसीएल या संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. परीक्षा मराठी भाषेतून घेता यावी, यासाठी अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाकडून पूर्णपणे प्रयत्न सुरु आहेत.- पुष्कर भगूरकर, मुख्य संशोधन अधिकारी, अर्थ आणि सांख्यिकी संचालनालय-------------‘आपलं सरकार’ या पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेची परीक्षा मराठीतून घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यंदाही माध्यम बदलण्यात आलेले नाही. मराठी सक्तीच्या नव्या परिपत्रकानुसार, प्रशासकीय कामकाजात मराठी अनिवार्य केले असताना मुख्यंत्र्यांच्या नावाने असलेल्या योजनेतच मराठीचा वापर झालेला नाही. ही शिष्यवृत्ती प्रक्रिया राबविणा-या अधिका-यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार आहे का?- आनंद भंडारे, तक्रारदार

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस