सर्व दुकाने मॉल बंद ठेवण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST2021-09-18T04:13:01+5:302021-09-18T04:13:01+5:30

पुणे : अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे येत्या रविवार दि. १८ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व प्रकारची दुकाने आणि ...

Order to close all shops and malls | सर्व दुकाने मॉल बंद ठेवण्याचे आदेश

सर्व दुकाने मॉल बंद ठेवण्याचे आदेश

पुणे : अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे येत्या रविवार दि. १८ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल्स (अत्यावश्यक सेवा वगळून) संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावेत़, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत़

गणेश विसर्जनासाठी रस्त्यांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी व कोरोना संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या दिवशी महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, फूडकोर्ट (मॉलमधील वगळून) पूर्ण दिवस चालू राहतील़ हे सर्व आदेश खडकी व पुणे कॅन्टॉमेंट बोर्ड हद्दीतील दुकांनाही लागू राहणार आहेत़ या आदेशाचे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० तसेच कलम १८८ नुसार संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे़

Web Title: Order to close all shops and malls