शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

राजगडच्या रोपवेला शिवप्रेमी संघटनांचा विरोध; मात्र स्थानिकांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 20:02 IST

सरपंच, उपसरपंच आणि स्थानिकांच्या बैठकीत निर्णय, राजगडासह तोरणावरही रोपवेची मागणी

ठळक मुद्देरोपवेमुळे राजगड आणि परिसरातील भागांचा विकास होईल.

मार्गासनी: छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड येथे रोपवे साठी स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. रोपवे संदर्भात काही शिवप्रेमी संघटना विरोध करत होते. त्यामुळे रोपवे हवा की नको यासाठी लव्ही बैठकीचे येथे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यातील स्थानिक मावळे रोपवेच्या समर्थनार्थ एकवटले असून राजगडासहित तोरणावर देखील तो व्हावा अशी मागणी एकमुखाने करत स्थानिकांनी रोपवेला पाठींबा दर्शविला आहे.

यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, भोर वेल्हे कृती समिती अध्यक्ष माऊली दारवटकर, इतिहास संशोधक दत्ता नलावडे, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, आदींसह बारा गाव मावळ परिसरातील व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन किल्ले राजगड स्थानिक मावळे व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.  

इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे म्हणाले,  रायगडच्या धर्तीवर राजगडावर विकास प्राधिकरण होण्यासाठी परिसरातील ग्रामपंचायतीने ठराव होणे गरजेचे असून या माध्यमातून गडांचा व परिसराचा विकास होईल. यावेळी राजगडावर रोपवेला पाठिंबा देण्यासाठी वेल्हे पंचायत समितीच्या माध्यमातून ठराव दिला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजbhor-acभोरRaigadरायगड