शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
2
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
3
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
4
विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; "काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात..."
5
पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या'
6
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास
7
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
8
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
9
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
10
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
11
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
12
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
13
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
14
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
15
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
17
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
18
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
19
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
20
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलवर अतिक्रमण कारवाई ; विरोध म्हणून ‘भाऊ’ चढला ना मग ‘टॉवर’ वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 15:19 IST

आपल्यावर जाणुनबुजुन कारवाई केल्याचा आरोप या युवकाने करीत टॉवरवर चढुन आंदोलन सुुरु केले आहे

ठळक मुद्देनगरपालिका प्रशासनाचे युवकाला विनंतीपत्रदुपारी उशिरापर्यंत हा युवक मनोऱ्यावरुन खाली न उतरण्याच्या भुमिकेवर होता ठाम

बारामती : शहरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असतानाच एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे.बारामती नगरपालिका प्रशासनाने केलेल्या अतिक्रमण कारवाईच्या विरोधात हॉटेल व्यवसाय करणारा युवक भिगवण रस्त्यालगत असणाऱ्या मोबाईल टॉवरवर चढुन बसला आहे. शहरातील इतर अतिक्रमण दुर्लक्षित करुन आपल्यावर जाणुनबुजुन कारवाई केल्याचा आरोप या युवकाने करीत टॉवरवर चढुन आंदोलन सुुरु केले आहे.

प्रशांत दादा सरतापे असे या युवकाचे नाव आहे.शहरातील शिवाजी चौकात त्याचे हॉटेल गणेश आहे. काही दिवसांपुर्वी नगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणांवर कारवाई केली.यावेळी सरतापे याच्या हॉटेलवर देखील कारवाई करण्यात आली.मात्र, शहरात इतर अतिक्रमणांकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असुन मला जाणुनबुजुन त्रास दिला जात असल्याचा आरोप करत सरतापे हा युवक आज सकाळी १० वाजता मोबाईलच्या टॉवरवर चढुन बसला. नगरपालिकेसह पोलीस प्रशासनाने हॉटेलवरील कारवाई मागे घ्यावी, ,शहरातील इतर अतिक्रमणांवर कारवाई करावी,अशा मागण्या करत त्या युवकाने टॉवरवर चढुन आंदोलन सुरु केले. मागण्या मान्य न झाल्यास टॉवर वरुन उडी मारण्याचा इशारा देखील या युवकाने दिला.त्यामुळे पोलीस प्रशासन,नगरपालिका प्रशासनाची धावपळ उडाली. सहायक पोलीस निरीक्षक निलेश अपसुंदे, बारामती नगरपालिका प्रशासनाने आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुनील धुमा ,महेश आगवणे आदी कर्मचारी तत्काळ या ठीकाणी पोहचले.सर्वांनी या युवकाला खाली उतरण्याचे आवाहन केले.मात्र, युवकाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय खालीउतरणार नसल्याची ठाम भुमिका घेतली. त्यातच बारामतीचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर हे रजेवर आहेत.त्यामुळे प्रशासनाने बारामती चे प्रभारी असलेले दौंड नगरपरीषदेचे मुख्याधिकारी विजय थोरात यांच्या स्वाक्षरीचे पत्र मागविण्यात आले.त्या पत्राची प्रिंट युवकाच्या आईच्या स्वाधीन करण्यात आली.त्यानंतर या युवकाला मोबाईलवर लेखी पत्र वाचुन देखील दाखविण्यात आले. त्यानंतर या युवकाला मोबाईलवर लेखी पत्र वाचुन देखील दाखविण्यात आले. त्याच्या आईने देखील प्रशासनाने जाणुनबुजुन कारवाई केल्याचा आरोप केला आहे.

मात्र, त्यांनतर देखील बारामतीचे मुख्याधिकारी कडुसकर यांच्याच हातुन पत्र स्वीकारणार असल्याची भुमिका घेत युवकाने खाली उतरण्यास नकार दिला आहे.नगरसेवक नवनाथ बल्लाळ,नगरसेवक गणेश सोनवणे यांनी या ठिकाणी धाव घेत या युवकाची समजुत घालण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे.मात्र, दुपारी उशिरापर्यंत हा युवक मनोऱ्यावरुन खाली न उतरण्याच्या भुमिकेवर ठाम होता. मनोऱ्यावर चढलेल्या युवकाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते.———————————————नगरपालिका प्रशासनाचे युवकाला विनंतीपत्र शिवाजी चौक येथील येथील चहा,भजीपाव,वडापाव विक्री केल्या जाणाऱ्या हॉटेल मालक हे दुकान काढणे बाबत कारवाई केली जाणार ना. शहरातील विविध अतिक्रमणे काढणेबाबत नगरपालिका नियमानुसार कारवाई करेल. घरपट्टी आकारणीबाबत नगरपरिषद नियमबध्द कार्यवाही करत आहे.टॉवरवरुन उतरुन आंदोलन रद्द करावे, ही विनंती,असे पत्र युवकाला देण्यात आले आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीEnchroachmentअतिक्रमण