शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे व पिंपरी चिंचवडला पाणी द्यायला आजही विरोध कायम : आमदार दिलीप मोहिते पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 17:19 IST

अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल

ठळक मुद्देचासकमान धरणाच्या पाण्यावर खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा पूर्ण अधिकार

राजगुरुनगर: भामा आसखेड धरणातून पुणे आणि पिंपरी-चिंचवडला पाणी द्यायला आपला विरोध पूवीर्ही होता; तो आजही कायम आहे.  चासकमान धरणामधून सुध्दा पीएमआरडीए पुणे परिसरात पाणी नेणार आहे.तालुक्याच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे.जमिनी धरणात गेल्या त्या उर्वरीत शेतकऱ्यांचे संपूर्ण पुनर्वसन,पूर्वी पुनर्वसन झाले तेव्हा तेथील स्थानिक शेतकऱ्यांना जमिनी द्याव्या लागल्या आणि ज्यांना मिळाल्या त्या भागात शेतीला पाणी, त्याचबरोबर चाकण एमआयडीसी,सेझ मुळे तालुक्यात वाढणाऱ्या लोकसंखेला भविष्यात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होणार नाही एवढे पाणी शिल्लक राहण्याचे स्पष्ट धोरण सरकारने राबवावे. अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला आहे.

मोहिते पाटील म्हणाले ,भामाआसखेड धरणाची ८.१४ टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे.त्यातील पुण्याला २.६५ टीएमसी,पिंपरी-चिंचवडला २ टीएमसी पाणी नेण्याचे धोरण राबवले जात आहे.धरणातून चाकण शहर,एमआयडीसी,आळंदी असे पाणी वाटप यापूर्वीच झालेले आहे.चाकण व सेझमध्ये कारखानदारी वाढल्याने चाकण,राजगुरुनगर,आळंदी या शहर परिसरात रहदारीत वाढ होत आहे.लोकसंख्या वाढता असताना शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचे संकट तालुक्यात देखील उभे राहणार आहे.याचा विचार कोणीही करीत नाही.म्हणून आपला सरकारच्या पाणी वाटप धोरणाला थेट विरोध आहे.पिंपरी चिंचवडला आपण पाणी नेऊ देणार नाही. 

धरण क्षेत्र आणि चाकण व त्यापुढील पूर्व भागात मोठे शेती क्षेत्र आहे.याच भागात धरणग्रस्तांसाठी स्थानिकांच्या जमिनी संपादित करून वाटप केले गेले. शेतीसाठी पाणी दिले जाईल असे प्रकल्प होताना सांगण्यात आले होते.प्रत्यक्षात येथे जाणारा धरणाचा कालवाच रद्द झाला आहे.लोकं कर्ज काढून नदी पात्रातून अनेक किलोमीटर सिंचन योजना करून पाणी नेत आहेत. अशा स्थितीत मात्र सरकार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य या गोंडस नावाखाली पुणे,पिंपरी-चिंचवडला पाणी नेत आहे याला आपला तीव्र विरोध आहे.

चासकमान धरणाच्या पाण्यावर खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा पूर्ण अधिकार आहे.राजगुरुनगर शहर,सेझ व परिसरातील वाढत्या नागरीकरणासाठी तेवढे पाणी आरक्षित करूनच शिरूरला पाणी दिले जावे यासाठी यापुढील काळात आपला संघर्ष राहील असे मोहिते पाटील यांनी सांगितले.

.......................................................    चाकण एमआयडीसी पाचवा टप्पा आणि भामा आसखेड धरणाग्रस्तांची नुकसानभरपाई रक्कम लॉकडाऊन पूर्वी जमा झालेली आहे.पाचव्या टप्यातील आदिवासी बांधवांचे सुमारे एक हजार कोटी आणि भामा आसखेड धरणग्रस्तांचे ३५० कोटी रुपये आहेत.कोरोनाच्या संकट काळात लोकाना हे हक्काचे पैसे मिळाले असते तर अनेकाना आधार मिळाला असता.केवळ अधिकारी वर्गाच्या बेजबाबदार वागण्यामुळे हे घडू शकले नाही.हातात असलेले काम होत नाही.मात्र दुसऱ्या भागात पाणी नेण्याचे नियोजन तातडीने राबविले जाते. हा दुजाभाव सहन करणार नाही. - दिलीप मोहिते पाटील (आमदार, खेड तालुका ) 

टॅग्स :KhedखेडWaterपाणीState Governmentराज्य सरकारFarmerशेतकरी