शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सनबर्न फेस्टिवलला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 00:54 IST

नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्याजवळ असलेल्या लवळे गावच्या हद्दीमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुळशीकरांच्या वतीने आमचा पूर्णपणे विरोध असून, त्यासाठी मोठे जनआंदोलन करणार असल्याची माहिती

भूगाव : नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्याजवळ असलेल्या लवळे गावच्या हद्दीमध्ये होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुळशीकरांच्या वतीने आमचा पूर्णपणे विरोध असून, त्यासाठी मोठे जनआंदोलन करणार असल्याची माहिती मुळशी तालुक्याचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप मारणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी सचिव दत्तात्रय जाधव हेही उपस्थित होते.पुणे शहर हे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते, परंतु हा सनबर्नचा नंगानाच लवळे येथील फ्लेम युनिव्हर्सिटीच्या तसेच सिंबायोसिस या शैक्षणिक संस्थांच्या संकुलांच्या काही मीटर अंतरावरच होणार असल्याने तालुक्यातून तसेच पुण्यातून संताप व्यक्त केला जात आहे. सनबर्नचा इतिहास हा स्पष्ट ड्रग्स, गैरवर्तन आणि अश्लीलतेविषयी बोलतो. सनबर्नमुळे तरुणांवर वाईट परिणाम होऊन ते वाईट मार्गाला जाण्याची जास्त शक्यता आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये अश्लीलताही मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळते. अशाच काही कारणांमुळे गोवा सरकारने सनबर्न फेस्टिव्हलसारख्या कार्यक्रमास परवानगी नाकारली. राज्य आणि केंद्र सरकार तसेच माननीय उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने गणपतीच्या उत्सवांमध्ये डीजे, डॉल्बी, तसेच दुर्गामाता उत्सव आणि त्याच संगीत प्रणालीचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. मग यांना परवनगी कशी मिळाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.सनबर्न पार्टी फेस्टिवल हे रेव्ह पार्टीसारखाच होणार आहे. सामाजिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक तसेच नैसर्गिक आणि मानवतेच्या भारतीय संस्कृती नष्ट करणारा हा उत्सवआम्हाला नको आहे, जो तालुक्यातील वातावरण दूषित करून तरुण-तरुणींना व्यसनाधीनतेकडे घेऊन जाईल.- अनुप मारणे (अध्यक्ष, मुळशी तालुका भाजपा युवा मोर्चा)

टॅग्स :PuneपुणेSunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हल