शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती संदर्भातील ग्रामविकास मंत्र्याच्या नवीन आदेशाला विरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 15:52 IST

राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात

ठळक मुद्देसर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून प्रशासक नियुक्ती करावी अशी मागणी

पुणे  : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यात ग्रामविकास मंत्र्यांनी या प्रशासकीय नियुक्त्या करताना अनुसुचित जाती तसेच जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिलांपैकी ज्या प्रवर्गासाठी त्या ग्रामपंचायतीत आरक्षण आहे त्याच प्रवर्गातील आरक्षणानुसार प्रशासक नेमणूक करावी असा नवीन आदेश काढला आहे. मात्र, या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेस हा त्यांचा पक्ष सोडून इतर सर्वच राजकीय पक्षांचा सर्वच स्तरावरुन तीव्र विरोध करण्यात येत आहे.त्यामुळे हा तुघलकी निर्णय ताबडतोब रद्द करावा अशी मागणी जोर धरत आहे.

प्रशासक नेमण्याचे अधिकार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिल्याचे एक पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांनी राज्यातील सर्व पालकमंत्र्यांसह बुधवारी (दि.१५) काढले. या पत्राची एक प्रत सर्व जिल्हा परिषदांनाही देण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाकडून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.      ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे आरक्षण हे पाच वर्षाच्या कालावधीसाठी असते ती मुदत संपल्यानंतर जर प्रशासक नेमण्याची वेळ आलीच तर त्यासाठी कुठल्याही प्रकारचे आरक्षण घटनेने दिलेले नसताना हा चुकीचा निर्णय जनतेवर लादण्याचा प्रयत्न होतोय तो निषेधार्ह असून मुख्यमंत्र्यांनी या आदेशाला स्थगिती देऊन सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून प्रशासक नियुक्ती करावी अशा सूचना द्याव्यात व याबाबतचा घोळ थांबवावा, अशी भूमिका उरुळी कांचनचे माजी सरपंच दत्तात्रय शांताराम कांचन व माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे यांनी व्यक्त केली.              

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतHasan Mushrifहसन मुश्रीफState Governmentराज्य सरकारsarpanchसरपंच