भाजपचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST2021-05-09T04:10:43+5:302021-05-09T04:10:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मागील साडेचार वर्षांतील भारतीय जनता पार्टीचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची संधी राष्ट्रवादी काँगेसचा शहराध्यक्ष म्हणून ...

Opportunity to bring BJP to power | भाजपचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची संधी

भाजपचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मागील साडेचार वर्षांतील भारतीय जनता पार्टीचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची संधी राष्ट्रवादी काँगेसचा शहराध्यक्ष म्हणून मिळाली आहे. येत्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ता ताब्यात घेणारच, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

हिराबाग चौकातील पक्ष कार्यालयात जगताप यांनी मावळते अध्यक्ष आमदार चेतन तुपे यांच्या हातून शनिवारी (दि. ८) शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव चांदेरे, महिला पदाधिकारी शिल्पा भोसले आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना जगताप म्हणाले की, भाजपच्या आधी सलग १० वर्षे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता होती. आम्ही जाहीर केलेल्या कामांचीच उद्घाटने विद्यमान सत्ताधारी भाजप आत्ता करत आहे. सत्तेच्या काळात त्यांनी त्यांचे म्हणून केलेले एकतरी काम दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

उपनगरांमध्ये भाजपचे वर्चस्व आहेच. ३३ गावांचा समावेश त्यांच्याच राज्यातील सत्ताकाळात झाला. आम्ही तिथेच काय, पण शहराच्या मध्यभागातही जोर दाखवू, कारण पुणेकरांचा आता भाजपवर ‘हे तर काहीच कामाचे नाहीत’ असा रोष आहे. संघटन वाढवणाऱ्यांवर भर देऊ. पक्षाचा तळागाळातला पाया विस्तारण्याला प्राधान्य असेल. महापालिकेतील प्रमुख विरोधक असलो तरीही कोरोना काळात आमचे त्यांना चांगल्या कामासाठी सहकार्य राहीलच; पण भ्रष्टाचार, लुटालूट खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जगताप यांनी दिला.

Web Title: Opportunity to bring BJP to power