बालविकास मंचचे सभासद होण्याची संधी
By Admin | Updated: November 10, 2014 05:03 IST2014-11-10T05:03:03+5:302014-11-10T05:03:03+5:30
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे

बालविकास मंचचे सभासद होण्याची संधी
पुणे : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी लोकमतने निर्माण केलेल्या बालविकास मंचची सभासद नोंदणी सुरू झाली आहे.
बालमनाचा सच्चा सवंगडी असलेल्या या मंचचे सभासद होण्याची संधी दि. १५ व १६ नोव्हेंबर शनिवारी व रविवारी रोजी मिळणार आहे. आपल्या पाल्यांना यात बालविकास मंचचे सभासद करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मंचचे सभासद झाल्यानंतर मुलांना विविध उपक्रमांमध्ये मोफत सहभागासह २ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची बक्षिसे दिली जाणार आहेत.
वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून मंचामार्फत मुलांमधील कलागुणांना वाव दिला जातो. त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. दर वर्षी विविध उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आला आहे. यंदाही मंचचे सभासद होण्याची संधी मिळणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना बालविकास मंचसारखा हक्काचा सवंगडी मिळवून द्यावा. द किड्स फोटोज, डान्स इन मोशन, कुमार पॅसिफिक मॉल, डायमंड वॉटर पार्क, डी क्युब प्लस, फन ७-डी, सृजन अॅनिमेशन इन्स्टिट्यूट, होम रिवाईज आणि श्नेल हे गिफ्ट प्रायोजक म्हणून लाभले आहेत.