अतिक्रमण कारवाईला स्टॉलधारकांचा विरोध

By Admin | Updated: July 4, 2014 06:34 IST2014-07-04T06:34:44+5:302014-07-04T06:34:44+5:30

डेक्कन जिमखाना परिसरात अनधिकृतरीत्या व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांसह रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने गुरुवारी कारवाई केली.

Opponents of the stalker in encroachment proceedings | अतिक्रमण कारवाईला स्टॉलधारकांचा विरोध

अतिक्रमण कारवाईला स्टॉलधारकांचा विरोध

पुणे : डेक्कन जिमखाना परिसरात अनधिकृतरीत्या व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांसह रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. मात्र, फेरीवाल्यांचे पुनर्वसन पूर्ण होण्यापूर्वीच महापालिकेने कारवाईचा बडगा उगारल्याने फेरीवाला संघटनांतर्फे विरोध करण्यात आला. त्या वेळी स्टॉलधारक व महापालिका अधिकाऱ्यामध्ये खडाजंगी झाली.
नदीपात्रातील भिडे पुलाजवळच्या चौपाटीच्या मागील बाजूस अनधिकृतरीत्या काही व्यवसाय नुकतेच सुरू झाले आहेत. तसेच, डेक्कन जिमखाना येथील पीएमटी बसस्टँडसमोरील जागेत काही व्यावसायिकांनी स्टॉलच्या बाहेरील बाजूस रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे काही स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली, तसेच त्यांना पर्यायी जागा देण्यात आली आहे, असे अतिक्रमणप्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. शहर फेरीवाला समितीची बैठक बुधवारी घेण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याबद्दल पथारी व फेरीवाला संघटनांनी आक्षेप घेतला आहे. नो हॉकर्स झोनमधील फेरीवाले व पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत कारवाई करण्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्र शासनाच्या फेरीवाला कायद्यानुसार बंदी आहे. तरीही महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई पथकाने कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप जाणीव संघटनेच्या संजय शंके यांनी केला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Opponents of the stalker in encroachment proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.