वाहतूक शाखेकडून 33 रिक्षांवर कारवाई
By Admin | Updated: September 5, 2014 00:54 IST2014-09-05T00:54:34+5:302014-09-05T00:54:34+5:30
पॅगो व सहा आसनी रिक्षांमधून बेकायदा प्रवासी वाहतुकीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. याची गंभीर दखल घेत वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

वाहतूक शाखेकडून 33 रिक्षांवर कारवाई
पुणो : पॅगो व सहा आसनी रिक्षांमधून बेकायदा प्रवासी वाहतुकीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. याची गंभीर दखल घेत वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी कारवाईचे आदेश दिले होते. वाहतूक पोलिसांनी आरटीओच्या अधिका:यांसोबत मोहीम राबवून अवैध वाहतूक करणा:या 33 रिक्षांवर कारवाई करीत 2क् हजार 2क्क् रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पॅगो रिक्षा आणि सहाआसनी रिक्षांमधून नियमबाह्य तसेच शासकीय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद झाल्यानंतरही रात्रभर प्रवासी वाहतूक सुरू असते. धोकादायक अवस्थेत चालणारी ही वाहतूक म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी खेळ आहे. त्यामुळेच कारवाई सुरू केल्याचे आवाड यांनी सांगितले.
पीएमपी बसला तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करून हे रिक्षाचालक अपघातांना निमंत्रण देत आहेत. रिक्षाचालकांच्या या मनमानी बेदरकारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांची कारवाई यापुढेही कायम राहणार असून, कोणत्याही परिस्थितीत पॅगो रिक्षांची धोकादायक वाहतूक बंद करणार असल्याचे आवाड म्हणाले.
सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग, वडगाव बुद्रुक, धायरी भागातील संयुक्त कारवाईदरम्यान 33 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. 17 रिक्षा परिवहन कार्यालयांच्या ताब्यात देण्यात आल्या, तर 13 चालकांकडून एकूण 2क् हजार 2क्क् रुपयांचा दंड वसूल केला.