ओतूर शिवजयंती साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST2021-02-20T04:30:58+5:302021-02-20T04:30:58+5:30
मिरवणूक ओतूर येथील नगरवेस ( क्रांती वेस ) येथील शिवपुतळ्यास निमंत्रित सरपंच गीता पानसरे व उपसरपंच प्रेमानंद ...

ओतूर शिवजयंती साधेपणाने साजरी
मिरवणूक ओतूर येथील नगरवेस ( क्रांती वेस ) येथील शिवपुतळ्यास निमंत्रित सरपंच गीता पानसरे व उपसरपंच प्रेमानंद अस्वार यांच्या हस्ते पुतळ्यास महाअभिषेक ,पूजा करुन शिवरायांची महाआरती करण्यात आली .
ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सह्याद्री युवामंचचे जयदीप डुंबरे यांनी स्वागत केले. यावेळी ओतूर ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सदस्य आशिष गोंदके गौरव फापाळे ,संचित फापाळे, जयदीप डुंबरे, गौरव डुंबरे ,राहुल तांबे ,निखिल काकडे ,रोहित डुंबरे ,नयन डुंबरे प्रणव बोडके ,विवेक शेटे ,महेश घोलप मयूर मते सिद्धेश करडिले वैभव हिंगणे यांनी विषेश परिश्रम घेतले .
जयदीप डुंबरे यांनी सूत्रसंचालन केले . गौरव डुंबरे पाटील यांनी आभार मानले.
शिवनेरी पेट्रोल पंपचे मालक यांनी नगर कल्याण महामार्गावरील ओतूर येथील पेट्रोल पंपावर शिवजयंती कोरोनाच्या पाश्वभूमीवर साधेपणाने शिवजयंती साजरी करून नवनिर्वाचित ओतूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार केला.
येथे सरपंच गीता पानसरे उपसरपंच प्रेमानंद अस्वार यांच्या हस्ते शिवप्रतिचे पूजन करण्यात आले आरती करण्यात आली .त्या नंतर ग्रामपंचायत सदस्यांचा सुधाकर डुंबरे यांनी सत्कार केला.
यावेळी अवधूत शिंगोटे प्रमोद बोडके ,अक्षय गाढवे राहुल पावडे ,ओंकार रसाळे प्रशांत ढमाले सोमनाथ शिंदे उपस्थित होते . चैतन्य विद्यालयात विद्यार्थी विना शिवजयंती साजरी करण्यात आली अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली . या वर्षी विद्यार्थ्यां शिवाय साधेपणाने साजरी करण्यात आली. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष अनिलशेठ तांबे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सर्वांनी शिवरायाचा जयजयकार करून अभिवादन करण्यात आले . या वेळी मंडळाचे सदस्य मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
शिवसह्याद्री युवा मंच ओतूर शिवजयंती उपस्थित मान्यवर .
शिवनेरी पेट्रोल पंप शिवजयंती उपस्थित मान्यवर