शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब नियोजनाचा भार स्त्रियांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 20:25 IST

शस्त्रक्रियेबाबत असलेले गैरसमज तसेच पुरुषी मानसिकतेमुळे महिलांनाच या शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले जात आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक शस्त्रक्रिया महिलांच्या : प्रतिसाद मिळत नसल्याचे पुरुष शस्त्रक्रियांचे उद्दिष्टही कमीकुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत अनेक सुशिक्षितांमध्येही भ्रामक समजुती

निनाद देशमुख 

पुणे : समाजातील पुरुषी मानसिकता अद्यापही बदलली नसल्याचे शासनाच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिलांनाच पुढाकार घ्यावा लागत असून, पुरुषांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यामुळे कुटुंब नियोजनाचा भार आजही महिलांनाच उचलावा लागत असल्याची वस्तूस्थिती समोर आली आहे. कुटुंब नियोजनासाठी शासनातर्फे कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. यासाठी शासनस्तरावर विविध योजनाही आहेत. मात्र, या शस्त्रक्रियेबाबत आजही पुरुषांमध्ये उदासीनता दिसून येते. शस्त्रक्रियेबाबत असलेले गैरसमज तसेच पुरुषी मानसिकतेमुळे महिलांनाच या शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले जात आहे. शासकीय स्तरावर प्रयत्न होऊनही शस्त्रक्रिया करण्यास पुढे येत नसल्याने स्त्रियांच्या तुलनेत पुरुष शस्त्रक्रिया करण्याचे  उद्दिष्टही कमी ठेवण्यात आले आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी शासनातर्फे उद्दिष्ट ठेवण्यात येते.गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक शस्त्रक्रिया या महिलांनी केल्याची माहिती पुढे आहे. त्या संख्येपुढे पुरुष शस्त्रक्रियांची संख्या ही नगण्य आहे. २०१३-१४ या वर्षात २८ हजार १५० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जवळपास हे उद्दिष्ट पूर्ण झाले असून यात २७ हजार २४३ महिलांनी शस्त्रक्रिया केल्या त्या तुलनेत या वर्षी केवळ २०४ पुरुषांनी शस्त्रक्रिया झाल्या. २०१४-१५ मध्ये २८ हजार ४०१ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी २३ हजार ८८९ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या, तर यावर्षी केवळ ५८ पुरुषांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०१५-१६ मध्ये २८ हजार ४०१ च्या उद्दिष्टापैकी २३८८६ शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. यापैकी २३७२१ महिलांच्या व १६५ पुरुषांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. २०१६-१७ मध्ये २६ हजार ४०६ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी केवळ ३३१ शस्त्रक्रिया पुरुषांच्या, तर २२ हजार ६११ शस्त्रक्रिया या महिलांच्या करण्यात आल्या. २०१७-१८ मध्ये २१ हजार ५७२ उद्दिष्टांपैकी केवळ ८२ पुरुषांनी कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या, तर १९ हजार ११८ महिलांनी या शस्त्रक्रिया केल्या. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांबाबत अनेक गैरसमजुतीमुळे आजही ही शस्त्रक्रिया टाळली जाते. आत सुशिक्षितांचे प्रमाणही मोठे आहे. याबाबत जनजागृती होत असली तरी पुरुषांकडून आजही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. भ्रामक समजुती कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबत अनेक सुशिक्षितांमध्येही भ्रामक समजुती आहेत. ही शस्त्रक्रिया केल्यास पुरुषार्थावर परिणाम होतो, असा समज आजही अनेकांचा आहे. कमी प्रतिसाद मिळत असल्याने शासनाने पुरुष शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट कमी करण्याची वेळ आली आहे. 

अ.क्र.     वर्ष     उद्दिष्ट     पुरुष     स्त्री     एकूण     टक्केवारी                शस्त्रक्रिया         शस्त्रक्रिया१        २०१३-१४    २८१५०    २०४    २७२४३    २७४४७    ९८२        २०१४-१५    २८४०१    ५८    २३८८९    २३९४७    ८४३        २०१५-१६    २८४०१    १६५    २३७२१    २३८८६    ८४४        २०१६-१७    २६४०६     ३३१    २२६११    २२९४२    ८७५        २०१७-१८    २१५७२      ८२    १९११८     १९२००    ८९

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला