शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल

By नितीन चौधरी | Updated: April 20, 2025 07:21 IST

Jamin Mojani marathi: पुनर्मोजणीतील नकाशे जीआयएस प्रणालीशी पडताळणी करून संकेतस्थळावर टाकले जाणार आहेत. त्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

- नितीन चौधरी, पुणे जमीन मोजणी प्रकरणांवर हरकत घेण्यात आल्यानंतर आता पुनर्मोजणी करण्यापूर्वी मोजणी अर्जदार, सहधारक, लगतधारक तसेच हिस्सेदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मोजणीप्रकरणी प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच या हरकतीवर जिल्हा अधीक्षकांकडे करण्यात आलेले द्वितीय अपील अंतिम असणार आहे. त्यामुळे सरकार स्तरापर्यंत जाणाऱ्या अपिलांना चाप बसणार आहे, तर पुनर्मोजणीतील नकाशे जीआयएस प्रणालीशी पडताळणी करून संकेतस्थळावर टाकले जाणार आहेत. त्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भूकरमापक अथवा परिरक्षण भूमापक या अधिकाऱ्यांमार्फत मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास भूमी अभिलेख उपअधीक्षक किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे पुनर्मोजणी अर्ज करता येईल. 

आता भूमी अभिलेख विभागाने पुनर्मोजणी अर्थात प्रथम अपील दाखल झाल्यानंतर मोजणी अर्जदारासह सहधारक, लगतधारक, हिस्सेदारांना नोटीस बजावून सुनावणी घेतली जाणार आहे. त्याशिवाय पुनर्मोजणी होणार नाही. 

नकाशे जीआयएस प्रणालीसोबत तपासणार

पुनर्मोजणी झाल्यानंतर पूर्वीची मोजणी आणि नंतरची मोजणी याचे नकाशे जीआयएस प्रणालीशी जोडून त्याची आवृत्तीनिहाय पडताळणी केली जाणार आहे. 

हे नकाशे महाभूमी पोर्टलवर अपलोड करून सर्व संबंधितांना त्याची ऑनलाइन नोटीस दिली जाणार आहे. नकाशे अपलोड केल्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नाही.

कुठे होईल दुसरे अपील?

या मोजणीवरही आक्षेप असल्यास द्वितीय अपील जिल्हा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षकांकडे करता येणार आहे. पूर्वी उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख संचालक व राज्य सरकारकडे अपील दाखल केले जात होते. नव्याने काढलेल्या परिपत्रकात आता दोनच अपील करता येणार आहे. जिल्हा अधीक्षकांनी दिलेला निर्णय यानंतर अंतिम असणार आहे. 

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागfarmingशेती