शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीराव भोसले बँकेच्या खातेदारांना हजारच काढता येणार : आरबीआयचे निर्बंध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 20:12 IST

बँकेत बचत आणि चालू खाते असणाऱ्या हजारो खातेदारांना त्याचा फाटका बसणार आहे. 

ठळक मुद्देगेल्या महिन्यात (२९ एप्रिल) आरबीआयने बँकेने मोठ्या रक्कमेच्या ठेवी स्वीकारण्यास केली मनाईआर्थिक अनियमिततेमुळे सहकार विभागाकडून बँकेवर कलम ८८ अंतर्गत देखील कारवाई सुरु

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध घातल्याने, बँकेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे बँकेतील सर्व खातेदारांना केवळ एक हजार रुपयांची रक्कमच खात्यातून काढता येणार आहे. त्यामुळे बँकेत बचत आणि चालू खाते असणाऱ्या हजारो खातेदारांना त्याचा फाटका बसणार आहे. गेल्या महिन्यात (२९ एप्रिल) आरबीआयने बँकेने मोठ्या रक्कमेच्या ठेवी स्वीकारण्यास मनाई केली होती. तसेच मुदतीपुर्वी ठेवी काढण्यास, मुदत ठेवींवर कर्ज देण्यासही निर्बंध घातले होते. त्या पाठोपाठ आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यावर देखील निर्बंध घातले आहेत. आरबीआयने त्या बाबतचा सविस्तर आदेश दिला आहे. आर्थिक अनियमिततेमुळे सहकार विभागाकडून बँकेवर कलम ८८ अंतर्गत देखील कारवाई सुरु आहे. बँकेतील सर्व खातेदारांना त्यांच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी जास्तीत जास्त एक हजार रुपयांची रक्कम खात्यातून काढता येईल, असे आरबीआयने आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. नवीन कर्ज स्वीकारण्यास अथवा कर्ज खात्याची पुर्नरचना करण्यावर देखील बंधन घातले आहे. नवीन खाती स्वीकारण्यावर देखील बंधन आले आहे. म्हणजेच या पुढे बँकेला बँकींग व्यवसाय करता येणार नाही. मात्र, बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. बँकेची स्थिती सुधारल्यानंतर निर्बंध शिथील करण्यात येतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. मात्र, आरबीआयने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास बँकेचा परवाना रद्द करण्याचा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे. -----------------बँकेवर तज्ज्ञ संचालक मंडळ नेमावे : मिहिर थत्तेबँकेच्या शहरात १२ शाखा असून, सुमारे ३० ते ३५ खातेदार आहेत. या खातेदारांचे हीत लक्षात घेऊन सहकार आयुक्तांनी बँकेवर ३ जणांच्या संचालक मंडळाची नियुक्ती करावी. त्यात सहकार विभागाचा अधिकारी, सीए आणि वसुलीची जाण असणारा अधिकारी असावा अशी मागणी सहकार आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी सहकार आयुक्तांची त्याबाबत भेट घेणार असल्याचे पुणेकर नागरीक कृती समितीचे मिहिर थत्ते यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक