शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हातच इतिहास घडवतात : साध्वी ऋतुंभराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 11:26 IST

राममंदिर ते राष्ट्र मंदिर अशा श्रद्धानिधी जनजागर अभियान

पुणे : संकल्पासमोर विकल्प नसेल तर संकल्प नक्की सिद्धीस जातो. आपल्या पूर्वजांनी राष्ट्रनिर्माणासाठी संघर्ष केला. तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या विखारी वृत्तीने राममंदिराच्या चळवळीची थट्टा केली. आस्थांचा  उपहास केला गेला. अशा वृत्तीला विरोध करण्याचे सामर्थ्य आपल्यात हवे. भविष्यात मंदिर उध्वस्त करण्याचे स्वप्नही कोणी पाहू शकणार नाही, अशा शब्दांत साध्वी ऋतुंभराजी यांनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे हात इतिहास घडवतात, हेही त्यांनी अधोरेखित केले. 

राममंदिर ते राष्ट्र मंदिर अशा श्रद्धानिधी जनजागर अभियानानिमित्त रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे साध्वी ऋतुंभराजी यांची जाहीर सभा पार पडली.' सियावर रामचंद्र की जय, 'पवनसुत हनुमान की जय' 'जय श्रीराम' अशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथील भव्य मंदिर निर्माण श्रद्धानिधी अभियानानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे,रवींद्र वंजारवाडकर, ह.भ.प. शिवाजी मोरे, पांडुरंग राऊत, संजय मुद्राळे, तुषार कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. अभियानप्रमुख तुषार कुलकर्णी यांनी राममंदिराच्या ऐतिहासिक लढ्यावर प्रकाश टाकला.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'राम मंदिर निर्माणाची चळवळ ही अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन झाले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर राममंदिर उभे राहत आहे.'

साध्वी ऋतुंभराजी यांनी 'भारत माता की जय, अखंड भारत की जय' च्या घोषणेने सुरुवात केली.त्या म्हणाल्या, 'कोणत्याही गोष्टीत सातत्य खूप महत्वाचे असते. आपल्या पूर्वजांनी प्राणांच्या वातीने संघर्षाचा दिवा अखंड तेवत ठेवला. आपण राजनैतिक गुलामी सहन केली, मात्र मनातील आशावाद संपू दिला नाही, शत्रूचे तळवे चाटले नाहीत. पूर्वजांचे शौर्य आणि धैर्यामुळे आपल्याला हे यश पहायला मिळाले आहे. आताच्या शिक्षणातून आपल्या मुलांना स्वाभिमान शिकता येईल का, असा प्रश्न आहे. मुलांना आंतरिक शक्ती देण्याचे काम पालकांचे आहे. मुलांवर स्वाभिमानाचे, राष्ट्रनिर्माणाचे संस्कार मातृशक्तीने केले पाहिजेत.'

-----देश निश्चित सीमांमध्ये बांधलेला आहे. देश राजशक्तीने चालतो, मात्र राष्ट्र आस्थेच्या प्रवाहाने चालते. हिंदूंच्या आस्थेची कायम खिल्ली उडवली गेली. वेब सिरीजमधून आस्थांचा उपहास केला जातो. चित्रपट, मालिकांमधून आपला निश्चय मोडण्याचा प्रयत्न केला जातो, थट्टा केली जाते. मात्र, आपला निश्चय इतका तकलादू नाही. सत्य सुर्यासारखे प्रकाशमान असते. ते कोणीच झाकू शकत नाही.  मध्ययुगातील वाईट काळ परत येणार नाही, याची व्यवस्था आपण करायला हवी.

टॅग्स :PuneपुणेRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या