अस्तित्व टिकवायचे तर हिंदूंसमोर हाच पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:41+5:302021-02-23T04:16:41+5:30
पुणे : सद्य:स्थितीत हिंदू संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, शौर्य याला अपमानित आणि समाप्त करण्यासाठी देशात प्रतिदिन नवीन षडयंत्र रचली ...

अस्तित्व टिकवायचे तर हिंदूंसमोर हाच पर्याय
पुणे : सद्य:स्थितीत हिंदू संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, शौर्य याला अपमानित आणि समाप्त करण्यासाठी देशात प्रतिदिन नवीन षडयंत्र रचली जात आहेत. देशातील विविध राजकीय पक्ष, विविध क्षेत्रातील लोक आणि बुद्धिजीवी वर्ग हिंदूंच्या सण-उत्सवांची थट्टा करून, तसेच हिंदू धर्माला अपमानित करून हिंदूंमध्ये न्यूनगंड निर्माण करत आहेत. यामुळे हिंदूनी आपसांतील भेदभाव विसरून आपले अस्तित्व टिकण्यासाठी संघटित व्हायलाच हवे, असे मत हिंदू जनजागृती समितीच्या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.
हिंदूंना धर्म विसरण्यास भाग पाडले जात आहे. देशातील हिंदू मंदिरांवर हल्ले केले जात आहेत. राममंदिरासाठी निधी गोळा करणाऱ्या रिंकू शर्मा या युवकाची देशाच्या राजधानीत चाकू भोसकून हत्या केली जाते. या परिस्थितीत हिंदूंकडे ‘हिंदूसंघटन’ हाच एकमेव पर्याय उरला आहे. असे न झाल्यास हिंदूंची ओळख पुसली जाईल. उर्जा आणि उत्साह यांनी भारलेल्या हिंदूंनी आता संघटित व्हायलाच हवे, असे आवाहन दिल्लीचे माजी आमदार कपिल मिश्रा यांनी व्यक्त केले.
हिंदू जनजागृती समितीचे धर्मप्रचारक नीलेश सिंगबाळ यांनी दीपप्रज्ज्वलन केले. सनातन संस्थेच्या आनंद जाखोटिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. सिंगबाळ म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली चर्च आणि मशिदींना हातही न लावणाऱ्या राज्य सरकारांनी केवळ हिंदूंची मोठी मंदिरे नियंत्रणात घेतली आहेत. सिनेमा, वेब सिरीज आदींच्या माध्यमांतून हिंदू धर्माचा अपमान केला जात आहे. हे रोखण्यासाठी भारतात ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ लागू केला पाहिजे.