शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातून थेट एकच रेल्वे; मुंबईतून सुटणाऱ्या पाच रेल्वेगाड्या पुणे मार्गे धावणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 15:07 IST

रेल्वे मंत्रालयाने देशभरातील विविध शहरांमधून रेल्वेसेवा सुरू करण्याचा घेतला निर्णय

ठळक मुद्दे२०० गाड्यांमध्ये थेट पुण्यातून सुटणारी केवळ दानापुर एक्सप्रेस ही एकमेव गाडीदुसऱ्या टप्प्यात थेट पुण्यातून आणखी काही गाड्या सुरू होण्याची शक्यता

पुणे : रेल्वे मंत्रालयाने देशभरातील विविध शहरांमधून रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. १ जूनपासून २०० रेल्वेगाड्या धावणार आहे. पण थेट पुण्यातून केवळ दानापुर एक्सप्रेस या एकमेव गाडीला मंजुरी मिळाली आहे. मुंबईतून सुटणाऱ्या पाच रेल्वेगाड्या पुणे मार्गे धावणार आहेत. पुणे रेड झोन असल्याने तसेच सध्या श्रमिक ट्रेनही धावत असल्याने अधिक रेल्वेगाड्यांना मिळाली नसल्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून रेल्वे ठप्प आहेत. काही दिवसांपासून देशभरात श्रमिक रेल्वे गाड्या धावत आहेत. ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मुजर, कामगारांना मुळ गावी नेण्यासाठी या गाड्यांना विशेष मंजुरी दिली जात आहे. आता या गाड्यांबरोबरच नियमित स्वरूपात देशभरात २०० गाड्या दि. १ जूनपासून धावणार आहेत. या गाड्यांचे सर्व डबे आरक्षित असणार असून गुरूवार (दि. २१) पासून आरक्षण खुले करण्यात आले आहे. आरक्षणाशिवाय एकाही प्रवाशाला या गाड्यांमधून प्रवास करता येणार नाही. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या प्रवाशांना गाडीत प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पॅन्ट्री कार असलेल्या गाडीमध्येच पाणी व इतर काही मोजके खाद्यपदार्थ देण्याची सुविधा असेल. प्रवाशांना घरूनच पाणी व खाद्यपदार्थ घेऊन यावेत, असे आवाहनही रेल्वेकडून करण्यात आले आहे.दरम्यान, या २०० गाड्यांमध्ये थेट पुण्यातून सुटणारी केवळ दानापुर एक्सप्रेस ही एकमेव गाडी आहे. मुंबईतून पुणे मार्गे जाणाऱ्या पाच गाड्यांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामध्ये गदग एक्सप्रेस, कोनार्क एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, हुसेनसागर एक्सप्रेस व गोवा एक्सप्रेस या गाड्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंडळाने या मार्गांची निवड केलेली आहे. पुणे हे सध्या रेड झोनमध्ये आहे. तसेच पुण्यासह, सातारा, कोल्हापुर, मिरज या भागातून दररोज श्रमिक गाड्या धावत आहेत. आतापर्यंत ७० हून अधिक गाड्या धावल्या आहेत. मुंबईतून पुणे मार्गे धावणाऱ्या पाच गाड्याही आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात थेट पुण्यातून आणखी काही गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात.-----------------दि. १ जून पासून पुण्यातून धावणाºया गाड्या -- पुणे त दानापुर एक्सप्रेस- मुंबई सीएसटी -भुवनेश्वर कोनार्क एक्सप्रेस (पुणे मार्गे)- मुंबई सीएसटी - गडग एक्सप्रेस (पुणे मार्गे)- मुंबई सीएसटी - बेंगलुरू उद्यान एक्सप्रेस (पुणे मार्गे)- मुंबई सीएसटी - हैद्राबाद हुसेनसागर एक्सप्रेस (पुणे मार्गे)- वास्को द गामा - निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस (पुणे मार्गे)

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार