शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

अवघ्या काही रुपयांत ५ लाखांचे विमा कवच, स्थायी समितीची योजना, करदात्या कुटुंबांना होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:26 IST

महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील करदात्या कुटुंबप्रमुखांचा अवघ्या ७० रुपयांमध्ये ५ लाख रुपयांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्यामाप्रसाद मुखर्जी विमा योजना’ असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे.

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील करदात्या कुटुंबप्रमुखांचा अवघ्या ७० रुपयांमध्ये ५ लाख रुपयांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्यामाप्रसाद मुखर्जी विमा योजना’ असे या योजनेचे नामकरण करण्यात आले आहे. करदाता कुटुंबप्रमुख दुर्दैैवाने एखाद्या अपघातात सापडला तर त्याच्या कुटुंबाला या विमा योजनेचा फायदा होणार आहे.महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अंदाजपत्रक सादर करतानाच या योजनेची कल्पना मांडली होती. त्या वेळी त्यावर अनेकांनी टीका केली, मात्र आता ही योजना आणखी महिनाभरात प्रत्यक्षात येत असून, त्याची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात या योजनेसाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मोहोळ यांनी सांगितले, की टीका करणाºयांना योजनेचे मर्मच समजले नाही. महापालिकेचे एकूण ८ लाख २५ हजार करदाते आहेत. त्याशिवाय झोपडपट्टीतील रहिवाशांकडून महापालिका सेवाशुल्क घेत असते. त्यांची संख्या साधारण २ लाखांच्या आसपास आहे. यातील कर जमा करणाºयांच्या कुटुंबप्रमुखाला एखादा अपघात झाला व त्यात दुर्र्दैैवाने त्याचे काही बरेवाईट झाले तर त्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचा काही मार्ग शोधावाच लागतो. त्यात बराच वेळ जातो. त्यादरम्यानच्या काळात जगण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे काहीच राहात नाही. अशा वेळी ही योजना उपयोगी पडेल.महापालिका : अपघाती विम्याचे पैसे तत्काळमहापालिका यात प्रत्येक करदात्या कुटुंबाचा ७० रुपयांचा विमा उतरवणार आहे. त्याचे प्रमाणपत्र त्याला दिले जाईल. कराप्रमाणेच हा विमाही वार्षिक असेल. त्या वर्षात त्याला दुर्दैैवाने अपघात वगैरे झाला तर त्याला विम्याचे पैसे तत्काळ मिळतील. याचीही रचना करण्यात आली आहे. थोडा जखमी असेल तर २५ हजार, जास्त जखमी असेल तर ५० हजार, एखादा अवयव निकामी झाला असेल तर १ लाख, त्यापेक्षा जास्त काही झाले असेल तर २ ते ४ लाख व दुर्दैैवाने मुत्युमुखी पडल्यास ५ लाख रुपये दिले जातील.यात फक्त संबंधित करदात्याने पूर्ण कर जमा केलेला असावा, त्याच्या नावे थकबाकी नको इतकीच अट ठेवण्यात आली आहे. दरवर्षी त्याने कर जमा केला की लगेचच त्याच्या नावाचा विमा उतरवला जाईल. यासाठीचा सर्व खर्च महापालिका करणार आहे व महापालिकेच्या एकूण अंदाजपत्रकाच्या तुलनेत तो अत्यंत कमी असाच आहे असे मोहोळ म्हणाले. या योजनेमुळे महापालिकेच्या मिळकर कर भरण्यात चांगली वाढ होईल, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे