पास केंद्रांवर वाहकांचीच नियुक्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:20 IST2020-12-03T04:20:48+5:302020-12-03T04:20:48+5:30

पुणे : मार्गावरील थांबे, तिकीट दर, वाहतुक विभागाच्या कामाची माहिती असल्याने पास केंद्रांवर वाहकांचीच नियुक्ती करण्याची मागणी पीएमटी कामगार ...

Only carriers should be appointed at the pass centers | पास केंद्रांवर वाहकांचीच नियुक्ती करावी

पास केंद्रांवर वाहकांचीच नियुक्ती करावी

पुणे : मार्गावरील थांबे, तिकीट दर, वाहतुक विभागाच्या कामाची माहिती असल्याने पास केंद्रांवर वाहकांचीच नियुक्ती करण्याची मागणी पीएमटी कामगार संघाने (इंटक) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे केली आहे. संघटनेचे महासचिव नुरद्दीन इनामदार यांनी याबाबतचे निवेदन पीएमपी अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांना दिले आहे. पास केंद्रांवर सफाई कर्मचारी महिलांची नियुक्ती करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे आस्थापना आराखडा खंडीत होत आहे. या आराखड्यानुसार प्रशासनाने वाहकांच्या नियुक्तीसाठी प्रक्रियाही पुर्ण केली आहे. त्यानुसारच या नियुक्त्या कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Only carriers should be appointed at the pass centers