शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
2
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
3
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
4
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
5
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
6
AIच्या मदतीने सामान्य माणूस बनवू शकतो अणुबॉम्ब! एआयच्या 'गॉडफादर'चा इशारा
7
Pitru Paksha 2025: पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?
8
वजन कमी करा, पैसे मिळवा! कंपनी देतेय जबरदस्त ऑफर; कर्मचाऱ्यांना वजन कमी केल्यावर लाखो डॉलर्स मिळणार
9
भाजपा खासदाराच्या बहि‍णीला भररस्त्यात दांडक्याने बेदम मारले; Video व्हायरल, नेमका प्रकार काय?
10
बापरे! नवऱ्याशी भांडल्यावर चिडली, गंगेत उडी मारली; मगर दिसताच रात्रभर झाडावर बसली अन्...
11
"मी विद्या बालनला फोन केला...", सुचित्रा बांदेकरांना आलेला रिजेक्शनचा अनुभव, सांगितला किस्सा
12
VIRAL :  बुर्ज खलिफाच्या मागून डोकावला 'ब्लड मून'; अविस्मरणीय क्षण तुम्ही पाहिलात का?
13
पितृपक्ष २०२५: पितरांना नैवेद्य दाखवल्यावर आवर्जून म्हणा 'हे' स्तोत्र; अन्यथा अपूर्ण राहील श्राद्ध विधी!
14
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये जवानांच्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा, पाकिस्तानी घुसखोरही अटकेत
15
Pitru Paksha: पितरांचे आत्मे घरी येणार असतील तर ते अशुभ कसे?
16
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
17
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता एटीएम-UPI ने काढता येणार पैसे, लवकरच 'EPFO 3.0' येणार
18
Pitru Paksha 2025: पितृ ऋण कशाला म्हणतात, पितृ पक्षात ते का फेडायचे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात? वाचा!
19
Online Food: Zomato नंतर Swiggy वरुनही ऑनलाइन जेवण मागवणं पडेल महागात, जीएसटीचाही परिणाम दिसणार
20
"डीजेमुळे वादनच झालं नाही", पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत आला अत्यंत वाईट अनुभव, सौरभ गोखले म्हणाला...

लग्नसोहळ्यात केवळ करिअर अंकाचे वाटप..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:00 IST

मानपान, सत्काराला फाटा : डोंगरे कुटुंबीयांचा आगळावेगळा उपक्रम

खोडद : खरं तर हल्लीच्या काळात लग्नसोहळा म्हटलं की मानपान, सन्मान, सत्कार, नारळ, टॉवेलटोपी असा प्रकार सर्रासपणे पाहायला मिळतो. नव्हे, तर हा प्रकार कार्यमालकास करावाच लागतो, अगदी मनाविरुद्ध केवळ समाजाच्या चालीरीती जपत, कोणीही नावठेवू नये म्हणून ! मात्र, या सगळ्या गोष्टींना फाटा देत आपल्या घरातील लग्नसोहळ्यात सर्व उपस्थित मान्यवरांना  करिअर अंकाचे वाटप करून समाजात एक आगळावेगळा पायंडा खोडद येथील डोंगरे आणि मांजरवाडी येथील मुळे कुटुंबीयांनी पाडला आहे.

सगळ्याच लग्नसोहळ्यात गंध लावणे,मानपान ,आहेर,वरात आदी बाबींवर प्रचंड खर्च केला जातो. अशा परिस्थितीमध्ये डोंगरे व मुळे परिवाराने त्यांच्या विवाह सोहळ्यात करिअर विशेषांक भेट देऊन विवाहास आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. हा उपक्रम आगळावेगळा आणि विधायक असून तो सर्वांसाठी पथदर्शी आहे, असे गौरवोद्गार जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाब नेहरकर यांनी काढले.गीतांजली व मच्छिंद्र दत्तात्रय डोंगरे यांचे सुपूत्र भाग्येश आणि विमल व अशोक तुकाराम मुळे यांची सुकन्या प्रितम यांच्या शुभ विवाहप्रित्यर्थ करिअर विशेषांकाचे प्रकाशन मांजरवाडी येथे करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका राजश्री बोरकर, मांजरवाडीचे सरपंच सूर्यकांत थोरात, चेअरमन डी. आर.थोरात, खोडदचे माजी सरपंच विजय थोरात, जालिंदर डोंगरे , वधू वराचे आई वडील आदी मान्यवरांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर लगेचच विवाहास आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना सदर विशेषांक भेट म्हणून देण्यात आला. वधू वरास शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या मान्यवरांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ह.भ.प. राजाराम महाराज जाधव, खोडदचे माजी उपसरपंच शिवाजी खरमाळे, भाऊसाहेब जाधव, शिवसेना तालूका प्रमुख माऊली खंडागळे आदी मान्यवरांनी वधू वरास शुभेच्छा दिल्या.मुख्यमंत्र्यांसह अनेक माननीयांकडून कौतुक४उपक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट, शिरूरचे खासदार शिवाजी आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, शिवांजली साहित्य पिठाचे अध्यक्ष कवी शिवाजी चाळक यांनी कौतुक करुन शुभसंदेश दिले आहेत.

टॅग्स :Puneपुणे