शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात अचानक उद्भवलेल्या आजारांकरिता अवघी नऊ लाखांची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 20:23 IST

साथीच्या रोगांच्या नियंत्रणाकरिता तोकडा निधी

ठळक मुद्दे कोरोनासारखे आजार व साथीच्या आजारांचा वाढता फैलाव लक्षात घेता भरीव निधीची आवश्यकता

पुणे : कोरोना विषाणूने बाधित झालेले रुग्ण पुण्यामध्ये आढळून आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, पालिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये अचानक उद्भवलेल्या आजारांमध्ये औषधे व तदनुषंगिक बाबी खरेदी करण्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते. या वर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये अवघी नऊ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता असलेल्या निधीलाही कात्री लावली असून १ कोटी ८० लाखांची तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे. अत्यावश्यक गोष्टींसाठी तोकडी तरतूद केली जात आहे. २०१६-१७ मध्ये ९ लाख ९२ हजार, २०१७-१८ मध्ये शून्य, २०१८-१९ मध्ये शून्य, २०१९-२० मध्ये ८ लाखांची तरतूद केलेली होती. यंदा त्यामध्ये अवघे एक लाख रुपये वाढविले आहेत. दिवसेंदिवस साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असतानाच त्यावरील उपाययोजनांसाठी दरवर्षी आर्थिक तरतूद केली जाते. आयुक्तांनी या योजनेसाठी दोन कोटी रुपयांची तरतूद त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये केली होती. त्याला स्थायी समितीच्या अंदाजपत्रकामध्ये कात्री लावली असून १ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद ठेवली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात ही तरतूद काही प्रमाणात वाढविलेली असली तरी ती अत्यंत कमी असल्याचेही दिसत आहे. स्थायी समितीच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात २ कोटी ६ लाख ८ हजार ८०६ रुपये, २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात १ कोटी ३७ लाख ३५ हजार २२२ रुपये, तर २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात १ कोटी २९ लाख ३८ हजार ९७७, तर २०१९-२० करिता १ कोटी ६० लाखांची तरतूद केलेली होती. यामध्ये यंदा २० लाख वाढविले असले तरी आयुक्तांनी सुचविलेल्या दोन कोटींच्या निधीला २० लाखांनी कात्री लावली आहे. कोरोनासारखे आजार व साथीच्या आजारांचा वाढता फैलाव लक्षात घेता भरीव निधीची तरतूद आवश्यक असतानाही त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोनाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका