शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Coronavirus Good News! पुण्यात आज फक्त 700 नवे कोरोना रुग्ण; पुणेकरांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 19:32 IST

अडीच महिन्यानंतर शहरात प्रथमच रूग्णसंख्या सातशेच्या आत..

पुणे : शहरात तब्बल अडीच महिन्यानंतर कोरोनाबाधितांची दैनंदिन वाढ सातशेच्या आत आली असून, सोमवारी दिवसभरात केवळ ६८४ जण नवे रूग्ण आढळून आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात २ मार्च रोजी प्रथमच सर्वाधित म्हणजे ६८८ कोरोनाबाधित एकाच दिवशी आढळून आले होते. तद्नंतर हजार, दीड, दोन हजारांच्या पुढे दररोज वाढत जाणारी ही कोरोनाबाधितांची संख्या आज प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात खाली आली आहे.  

शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी तपासण्यांचे प्रमाण हे दहा हजारांच्या पुढे असतानाही, सोमवारी ( दि १७) तपासण्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. आज दिवसभरात ८ हजार ८६२ जणांनी तपासणी करून घेतली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ८.७० टक्के इतकी आहे़ १२ ते १५ टक्क्यापर्यंत असलेली कोरोनाबाधितांची रोजची टक्केवारीही, गेल्या अडीच महिन्यात प्रथमच दहा टक्क्यांच्या आत आली आहे. तर शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही वीस हजाराच्या आत आली असून, आजमितीला शहरात १८ हजार ४४० सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात २ हजार ७९० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ६६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़६८ टक्के आहे.

शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार २८७ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४०२ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २३ लाख ७२ हजार ३४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ५९ हजार ९८७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  तर यापैकी ४ लाख ३३ हजार ७९८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर आतापर्यंत शहरात ७ हजार ७४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

-----------

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या