मेंदूच्या ७० टक्के इजा हेल्मेट न वापरामुळेच

By Admin | Updated: February 7, 2016 04:05 IST2016-02-07T04:05:34+5:302016-02-07T04:05:34+5:30

शहरात अपघात होणाऱ्यांमध्ये मेंदूला इजा पोहोचणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे. यातील सुमारे ७० टक्के गंभीर इजा या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे होतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञांनी

Only 70 percent of brain damage is due to use of helmet | मेंदूच्या ७० टक्के इजा हेल्मेट न वापरामुळेच

मेंदूच्या ७० टक्के इजा हेल्मेट न वापरामुळेच

पुणे : शहरात अपघात होणाऱ्यांमध्ये मेंदूला इजा पोहोचणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे. यातील सुमारे ७० टक्के गंभीर इजा या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे होतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरातील मेंदूविकारतज्ज्ञांकडे येणाऱ्या अशा गंभीर रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून येत आहे.
हेल्मेटसक्तीवरून सध्या शहरात मोठे वादळ उठले आहे. पण हेल्मेट न वापरता अपघात झाल्यास डोक्याला मार लागून जीव जाण्याची वेळही येऊ शकते, याकडे मात्र विरोधक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
याबाबत मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. सुजित जगताप म्हणाले, की शहरात आणि प्रामुख्याने हायवेवर दुचाकीचे जे अपघात होतात त्यातील बहुतांशी नागरिकांना डोक्याला मार लागतो. हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागून अनेक गंभीर गोष्टी होऊ शकतात. डोक्याला नुसता मुका मार लागला तरी आत रक्तस्राव होऊ शकतो, सूज येऊ शकते आणि ती रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. माझ्याकडे अपघातात डोक्याला लागलेले अनेक रुग्ण येतात. त्यापैकी सुमारे ८० ते ९० टक्के रुग्णांनी हेल्मेटच वापरलेले नसते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात.
मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश भंडारी म्हणाले, की अनेकदा आपण ऐकतो की एखाद्याचा अपघात झाला, त्याच्या शरीराला काहीच झाले नाही, पण डोक्याला मार लागला आणि त्याला अर्धांगवायू झाला, रक्तवाहिन्या फुटल्या, रक्तस्राव झाला, हे खरे आहे. शहरात जे अपघात होतात, त्यात डोक्यावर दुचाकीस्वार पडला आणि त्याने हेल्मेट घातलेले नव्हते, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊ शकते. खोपडी फुटली तरच गंभीर इजा होते असे नाही. तर पडताना डोक्याला जोराने हादरा बसला, मेंदू हालला, छोट्या मेंदूला मार लागला तरी ते जिवावर बेतू शकते. यामुळे रक्तवाहिन्या फाटू शकतात. आमच्याकडे अशी अपघात झालेल्या येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांशी रुग्ण हे तरुण असतात.

हेल्मेट वापराचे
असेही फायदे
हेल्मेट वापरामुळे डोक्याची सुरक्षा होते. त्याचबरोबर प्रदूषणयुक्त हवा कमी प्रमाणात शरीरात जाते, डोळयांचे वारा आणि धुरापासून संरक्षण होते. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांच्या हेल्मेट वापरामुळे दुचाकीवरून जाताना कानांना वारा लागत नाही आणि मायग्रेनचा त्रास होत नाही, अशी माहिती डॉ. सुजित जगताप यांनी दिली.

Web Title: Only 70 percent of brain damage is due to use of helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.