शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंच्या खात्यात केवळ ४३ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 23:59 IST

ठेवीदार आणि बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विविध २७५ बँक खात्यात केवळ ४३ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे : ठेवीदार आणि बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विविध २७५ बँक खात्यात केवळ ४३ कोटी ९ लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती पुढे आली आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके दाम्पत्यांना अटक केली होती. त्यानंतर सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. डी. एस. कुलकर्णी यांची पुणे, मुंबई येथील कार्यालये, घरे यांच्यावर छापे घालून आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे ताब्यात घेतली होती. तसेच त्याचवेळी त्यांची विविध बँकांमध्ये असलेली २७५ बँक खाती गोठवली होती. या बँक खात्यात मोठी रक्कम शिल्लक असेल, अशी पोलिसांची अपेक्षा होती. डीएसके यांच्याविरोधात आतापर्यंत ५ हजारांपेक्षा अधिक तक्रारदारांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दिल्या आहेत.डीएसके यांचे आर्थिक व्यवहार तपासण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे. त्यांनी डीएसके यांच्या बँक खात्याची तपासणी करून पोलिसांना फॉरेंसिक रिपोर्ट नुकताच सादर केला. त्यानुसार या सर्व बँक खात्यात मिळून केवळ ४३ कोटी ९ लाख रुपये असल्याची माहिती समोर असली असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी दिली. पोलिसांनी डीएसके यांच्या ७ आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. याशिवाय त्यांच्या मालमत्तांची यादी करून त्याच्या लिलावाच्या प्रक्रियेसाठी महसूल विभागाकडे पाठविली आहे. महसूल विभागाने २४६ मालमत्तांचा प्रस्ताव तयार करून त्याची अधिसूचना काढण्यासाठी गृहखात्याकडे सादर केला आहे. ही अधिसूचना निघाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्ता लिलावाची प्रक्रिया सुरू होणार आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणे