पोलिसांना मिळाली फक्त १0१ बुलेटप्रूफ जॅकेट
By Admin | Updated: February 14, 2015 05:37 IST2015-02-13T23:56:08+5:302015-02-14T05:37:21+5:30
पुणे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे यापूर्वी झालेल्या दोन हल्ल्यंवरून स्पष्ट झाले आहे. दहशतवाद्यांचा मुंबईसारखा थेट हल्ला झाल्यास त्याचा

पोलिसांना मिळाली फक्त १0१ बुलेटप्रूफ जॅकेट
पुणे : पुणे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे यापूर्वी झालेल्या दोन हल्ल्यंवरून स्पष्ट झाले आहे. दहशतवाद्यांचा मुंबईसारखा थेट हल्ला झाल्यास त्याचा पोलिसांना सक्षमपणे सामना करता यावा यासाठी अखेर पोलिसांच्या हाती बुलेटप्रूफ जॅकेट पडली आहेत. मात्र, त्यात बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दल (क्यूआरटी) व पोलीस मिळून पुण्यासाठी केवळ १०१ बुलेटप्रूफ जॅकेट उपलब्ध झाली असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
मात्र, ८ हजारांहून अधिक पोलीस बळ असलेल्या व ४० लाख नागरिकांची सुरक्षा असलेल्या पोलिसाना केवळ १०१ बुलेटप्रूफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
क्यूआरटी ५६, नियंत्रण कक्ष १२, मुख्यालय क्वार्टर गार्ड ४, मुख्यालय मेन गेट गार्ड ३, बीडीडीएस पथक ५ असे बुलेटप्रूफ जॅकेटचे वाटप करण्यात आले असून, मुख्यालयाच्या भांडारामध्ये २१ जॅकेट शिल्लक आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे.
तसेच, पोलीस ठाणेनिहाय जॅकेटचे वितरण केले नसल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते जयप्रकाश उणेचा यांनी माहिती अधिकारात ही बाब समोर आणली आहे. (प्रतिनिधी)