विद्यापीठात मिळणार ऑनलाइन योग शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST2021-06-22T04:08:51+5:302021-06-22T04:08:51+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चालू शैक्षणिक वर्षांपासून योग शिक्षणातील मूलभूत माहिती देणारा ‘बेसिक्स ऑफ योगा’ हा ऑनलाइन ...

Online yoga education will be available at the university | विद्यापीठात मिळणार ऑनलाइन योग शिक्षण

विद्यापीठात मिळणार ऑनलाइन योग शिक्षण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चालू शैक्षणिक वर्षांपासून योग शिक्षणातील मूलभूत माहिती देणारा ‘बेसिक्स ऑफ योगा’ हा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

योग दिवसाचे औचित्य साधत या अभ्यासक्रमाची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केली. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, आयुष मंत्रालयातील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन, आंतरराष्ट्रीय योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, ‘ईएमआरसी’चे संचालक डॉ. समीर सहस्रबुद्धे, ‘आयएमई’चे प्रमुख श्रीरंग गोडबोले आदी उपस्थित होते.

डॉ.अपूर्वा पालकर म्हणाल्या, हा अभ्यासक्रम योग विषयातील मूलभूत गोष्टींची माहिती देणारा असून या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थी त्यासाठी अर्ज करू शकतील. ६० तासांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार आहेत.

डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, योग साधनेला लोकांनी मान्य केले असून याचे पुरावे आपल्याला गुगलवर मिळतील. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून योग विषयातील नवे संशोधन खरी माहिती मिळेल.

डॉ. समीर सहस्रबुद्धे म्हणाले, ऑनलाईन शिक्षणातील तोचतोपणा या अभ्यासक्रमात येऊ नये, यासाठी आम्ही शिक्षक विद्यार्थी संवाद, विषयाची अतिरिक्त माहिती, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे असे अनेक नवे प्रयोग या अभ्यासक्रमात केले आहे.

-----

नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून व पारंपरिक ज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र यांची सांगड घालत हा अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शिक्षणाबरोबरच शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी हा अभ्यास उपयुक्त ठरेल.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

-----

Web Title: Online yoga education will be available at the university