जयहिंद विद्यालयात ऑलनाईन प्रशिक्षण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:18 IST2021-02-28T04:18:00+5:302021-02-28T04:18:00+5:30
शिबिराचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका प्रा. शुभांगी गुंजाळ, मुख्याधिकारी प्रा. डी. एस. गल्हे ...

जयहिंद विद्यालयात ऑलनाईन प्रशिक्षण शिबिर
शिबिराचे आयोजन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालिका प्रा. शुभांगी गुंजाळ, मुख्याधिकारी प्रा. डी. एस. गल्हे यांनी प्रोत्साहन दिले. संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूंच्या महासाथीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, प्राणघातक कोरोना विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे अतिआवश्यक असताना, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन शिक्षणाच्या बाबतीतही करणे गरजेचे असल्यामुळे लॉक डाऊनच्या काळात ई- शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे ठरत आहे. ई-शिक्षण विद्यार्थ्यांना देत असताना, शिकविण्याची तयारी कशी करावी, त्यात अभ्यासक्रम कशा प्रकारे प्रभावीपणे घ्यावा, त्यात प्रामुख्याने काय असावे या सगळ्या गोष्टींचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून २५ नोव्हेंबर २०२० या दिवशी जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथील सर्व शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. प्राचार्य डॉ. डी. जे. गरकळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या या अभिनव उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ आणि सचिव विजय गुंजाळ यांनी कौतुक केले.
या उपक्रमासाठी विद्यापीठाकडून सारंग भिडे, राजेश वर्तक, विनय शेडगे, वरद कुलकर्णी व अभिषेक माने हे उपस्थित होते.